PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचे कामकाज जबाबदारीने सांभाळणारे सोमनाथ कारभळ सेवानिवृत्त!

HomeपुणेBreaking News

PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचे कामकाज जबाबदारीने सांभाळणारे सोमनाथ कारभळ सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule May 31, 2023 1:24 PM

Walk-in cooler system for storing vaccine stock of Pune Municipal Corporation is working
Pune Municipal Corporation | स्मार्ट पुणे महापालिका भवनात कर्मचाऱ्यांसाठी कँटीन कधी होणार?
PMC Schools Sanitary Napkins | शहर शिवसेना पुणे मनपाच्या शाळांत सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करण्यास तयार | प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचे कामकाज जबाबदारीने सांभाळणारे सोमनाथ कारभळ सेवानिवृत्त!

PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य सभेचे (General Body) गेल्या 10 वर्षांपासून जबाबदारीने काम सांभाळणारे ज्येष्ठ समिती लेखनिक सोमनाथ कारभळ (Somnath Karbhal) आज (31 मे) सेवानिवृत्त (Retire) झाले. सुमारे 31 वर्ष त्यांनी महापालिकेच्या नगरसचिव विभागात (PMC Municipal secretary Department) काम केले. विभागातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना मुख्य सभेच्या कामकाजाची जबाबदारी कारभळ यांनी अतिशय निष्ठेने पार पाडली. (PMC Pune General Body)
सोमनाथ कारभळ हे 1992 साली महापालिकेच्या नगरसचिव विभागात रूजू झाले.  सुरुवातीला त्यांनी ज्युनियर ग्रेड लेखनिक या पदावर काम केले. त्यानंतर आपल्या कामाने पदोन्नती घेत ते समिती लेखनिक झाले.  आज ते ज्येष्ठ समिती लेखनिक म्हणून निवृत्त झाले. नगरसचिव विभागात त्यांनी 31 वर्ष काम केले. सुरुवातीला त्यांनी टायपिंगचे काम केले. कारभळ हे मुख्य सभेचे काम गेल्या 10 वर्षांपासून पाहत होते. (Pune Municipal Corporation Employees)
मुख्य सभेचे काम हे क्लिष्ट असते. सभेत सगळे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. महापालिका प्रशासन आणि नगरसेवक या दोघांना एकत्र घेत हे कामकाज करणे आवश्यक असते. यामध्ये मुख्य सभा बोलावणे, सभेची कार्यपत्रिका तयार करणे, सभासदांना घरी पाठवणे, महापालिकेच्या वेगवगेळ्या खात्याना अवगत करणे, कार्यपत्रिका सभागृहात फाईलला लावणे, प्रश्न उत्तरे आयुक्त कार्यालयात पाठवणे आणि त्याचे उत्तरे आले कि सभासदाच्या फाईलला लावणे. वृत्तांत छापणे अशी कामे असतात. general body विभागाला ला कमी कर्मचारी असताना देखील कारभळ यांनी आपले काम चोख केले. तसेच सभासदांची/नगरसेवकांची हजेरी घेण्याचे काम देखील याच कार्यालयाला करावे लागते. तसेच सभासद आणि पत्रकारांना docket उपलब्ध करून दिले जातात. अशी जिकिरीची आणि तांत्रिक कामे कारभळ यांनी आपल्या सेवेत केली. (PMC Pune News)
मुख्य सभेचे कामकाज ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. यामध्ये एखादी चूक देखील महागात पडते. जबाबदारीने काम करावे लागते. मी हे काम वेळेच्या वेळी आणि जबाबदारीने केले. नागरिकांना व्यवस्थित वागणूक दिली. याचा निवृत्त होताना आनंद वाटतो आहे. आता निवृत्त झाल्यानंतर  समाजकार्य करणार. गावी राहणार. तसेच मुख्य सभेच्या कामकाजाबाबत कार्यालयातील नवीन कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची तयारी आहे.
सोमनाथ सखाराम कारभळ, सेवानिवृत्त सेवक, पुणे महापालिका.

—-
News Title | Somnath Karbhal, responsible for the General body meeting of Pune Municipal Corporation, retired!