PMC Pune Encroachment Department | पुरेसा बंदोबस्त असल्याशिवाय अतिक्रमण कारवाया करणार नाही
| अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांची भूमिका

व्यावसायिकांवर गुन्हा दाखल
सध्या पुणे शहरामध्ये जी-२० बैठकांच्या अनुषंगाने शहरातील रस्ते, पदपथांवरील सर्व प्रकारची अनधिकृत अतिक्रमणे हटविणेबाबत उप आयुक्त (अतिक्रमण) यांनी यापूर्वी आढावा बैठकांमध्ये वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांमधील अतिक्रमण निर्मुलन पथकांमार्फत रस्ता, पदपथांवरील सर्व अतिक्रमणे हटविणेची मोहीन अतिक्रमण विभागामार्फत प्रखरपणे राबविली जात आहे. त्या अनुषंगाने दि. १६/०५ रोजी ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीमध्ये अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई पुणे स्टेशन ते कैलास स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता (नायडू हॉस्पिटल वसाहत) या दरम्यान करीत असताना तेथील पथारी व्यवसायिकांनी या कार्यालयाकडील सेवक प्रशांत कोळेकर, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, रवी जाधव, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व आकाश लोखंडे, सुरक्षा रक्षक यांचेवर जीवघेणा हल्ला करून मोठ्या प्रमाणात धक्काबुक्कीसह मारहाण करण्यात आलेली आहे. सदर घटनेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्या आलेला असून मारहाण
करणाऱ्यांपैकी ५ जणांना स्थानिक पोलीसांनी अटक केली असून २ जनांचा शोध घेणे चालू आहे. (PMC Pune News)
: याआधी देखील मारहाणीची घडली होती घटना
यापूर्वी १९/०३/२०२३ रोजी मध्यवर्ती पथकांचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्री. अंकुश बादाड हे शिंदे पूल, (एनडीए ग्राउंडलगत) वारजे माळवाडी, एनडीए रस्ता अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करीत असताना फेरीवाला व्यवसायिकाने मारहाण करून त्यांचे हाताची बोटे फ्रॅक्चर केलेली असून त्यांचे खांदयाची हाडे देखील फ्रॅक्चर झालेली असल्याने त्याबाबत देखील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल करून कलम ३५३, ३३२, ३३३, १८३, १८६ ५०४, १४१, १४३, १४७, १४९ इत्यादी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधीत सेवक आजमितीस त्याबाबत उपचार घेत आहेत. (Pune Municipal Corporation)
मनपा भवनात हिरवळीवर आंदोलन
२) कारवायांच्यावेळी आवश्यक ती यंत्रसामुग्री / मनुष्यबळ व वाहने सतत उपलब्ध करून दिली जावीत.
३) कोणत्या ही संवेदनशील कारवायांच्या वेळी स्थानिक पोलीस बंदोबस्त त्वरित उपलब्ध करून देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी.
४) या विभागामधील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक / अतिक्रमण निरीक्षक / क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक यांच्या या एकाच विभागामध्ये सातत्याने वादविवादाचे कामकाज कराने लागत असल्याने कार्यकुंठीतता
येऊन मानसिकतेवर परिणाम होऊ लागल्याने आमच्या मनपाच्या इतर समकक्ष विविध विभागांमध्ये २ तातडीने बदल्या करण्याचे धोरण तयार करून बदल्या करण्यात याव्यात. (Pune News)