PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन
PMC Pune Employees Workshop | पुणे महानगरपालिका एम्प्लॉईज युनियनच्या वतीने (PMC Employees Union) पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation Employees) सेवकांची कार्यशाळा रोकडोबा मंदिर कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, पुणे येथे आज घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत विचारमंथन करण्यात आले. यावेळी पीएमसी एम्पलाॅईज युनियनच्या वतीने सेवकांना युनियनचा सभासद क्रमांक देणेत आले. (PMC Pune Employees Workshop)
पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) सेवक पुणे शहराचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच समस्यांचे सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यातून निराकारण करतात. पुणे महानगरपालिकेची वाढती हद्द, रिक्त असलेली पदे यामुळे सेवकांना दैनंदिन कामे करताना ताणतणाव तसेच वैयक्तिक आरोग्यविषयक प्रश्न उद्भवतात. याकरिता या कार्यशाळेत करिअर कौन्सिलर तसेच थेरपिस्ट संध्या पाटील यांचे व्याख्यान ठेवले होते. (Pune Municipal Corporation Employees)
पुणे महानगरपालिकेतील सेवकांची रखडलेली पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सेवकांच्या कालबद्ध बदल्या तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे या कार्यशाळेत अध्यक्ष बजरंग पोखरकर (President Bajrang Pokharkar) तसेच जनरल सेक्रेटरी बापू पवार यांनी आवाहन केले. (PMC Pune Employees)
या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane), सचिन इथापे उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग (Deputy Commissioner Sachin Ithape), उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam), मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री कैलास वाळेकर , सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (Security Officer Rakesh Vitkar),कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे तसेच इतर अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (PMC Employees Union)
अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सेवकांच्या कार्यक्षमतेवर शहरीकरणामुळे तसेच कामकाजातील वाढता ताण तणावामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवतात याकरिता अशा कार्यशाळेचे आयोजन होणे गरजेचे आहे, असे महत्त्व विषद केले. उपायुक्त सचिन इथापे यांनी सेवकांच्या रखडलेल्या प्रश्नांविषयी सामान्य प्रशासन विभागाकडून तातडीने आढावा घेतला जाईल व सेवकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे सर्व सेवकांना आश्वस्त केले. (Pune Corporation Employees)
या कार्यशाळेचे विशेष हे कि, आज पर्यंत कोणत्याही सेवकाला युनियन सभासद नंबर दिला गेला नव्हता, तो यामध्ये दिला गेला. याबाबत कर्मचारी युनियन आणि पदाधिकारी यांचे कौतुक होत आहे.
—–
News Title | PMC Pune Employees Workshop | Brainstorming in the workshop on questions of municipal employees