PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule May 30, 2023 4:24 PM

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश
PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये! 
Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी

| राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभा यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

PMC Pune Education Department | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाकडील मराठी माध्यम मुख्याध्यापक व मराठी माध्यम उपशिक्षक या पदावरील सेवाज्येष्ठता यादी (Seniority List) अंतिम करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभा संघटनेने आक्षेप घेतला आहे. ही यादी जाहीर करणे थांबवून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. (PMC Pune Education Department)

याबाबत संघटनेचे अध्यक्ष विकास काटे (Vikas kate) यांनी सांगितले कि, १९९९ साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील शिक्षकांना त्यांच्या मूळ तारखेनुसार सेवाज्येष्ठता देणे बाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याचवेळी नंतर पुणे मनपा मधून वगळलेली गावांमधील शिक्षक पुन्हा जिल्हापरिषदेकडे गेले आणि सेवाज्येष्ठता न देणेबाबत शपथपत्र देवून सन २००९ साली पुन्हा पुणे मनापा सेवेत आले. अशा शिक्षकांना सेवाज्येष्ठता देणेबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निकालात कोठेही म्हंटलेले नाही. तसेच हा निर्णय फक्त याचिकाकर्त्यांसाठी लागू असल्याने सन २००९ मध्ये आलेल्या शिक्षकांना मूळ सेवाज्येष्ठता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाने या शिक्षकांना तारखेपासून
मूळ सेवाज्येष्ठता देण्याचा घाट घातला जात आहे. याविरोधात संघटना उच्च न्यायालयात दाद मागत आहे. तरी उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत मुख्याध्यापक पदोन्नत्या करण्यात येवू नयेत. असे काटे यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)

 प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी गुणवत्ताक्रमानुसार करा

काटे यांनी पुढे सांगितले कि, मराठी माध्यमाच्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी महाराष्ट्र शासनाच्या २२/०६/२०२१ च्या अधिसूचनेच्या नियमावलीनुसार केलेली आहे.  शासन निर्णयानुसार आज्ञापत्रातील गुणवत्ताक्रम लक्षात घेवून कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात यावी. परंतु शिक्षण विभागाने (प्राथमिक) मराठी माध्यम प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता तयार करताना आज्ञापत्रातील गुणवत्ताक्रमाचा विचारच केला नसल्याने ही यादी सदोष आहे. (जुने आज्ञापत्रे आणि गुणवत्तायादी शोधण्याची तसदी पडू नये म्हणून जन्मदिनांकानुसार सेवाज्येष्ठता यादी तयार केली आहे.) त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार आहे. तरी ही सदोष यादी रद्द करवून आज्ञा पत्रातील गुणवत्ता क्रमानुसार यादी करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC Pune Marathi News)
—-
News title | PMC Pune Education Department | Demand to stop publication of primary teacher seniority list| State Graduates, Primary Teachers and Center Pramukh Sabha demand to Municipal Commissioner