PMC Pune Cycle Rally | पुणे महापालिकेच्या सायकल फेरीत २ हजार २०० नागरिक सहभागी
| जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन
PMC Pune Cycle Rally | पुणे येथे होणाऱ्या जी-२० ‘डिजिटल इकॉनॉमी’ (G 20 Summit Pune) कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने (PMC Pune Cycle Club) लोकसहभागासाठी सायकल फेरीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले. ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन आयोजित सायकल रॅलीचा शुभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या हस्ते करण्यात आला. सायकल फेरीमध्ये सुमारे २ हजार २०० नागरिक सहभागी झाले. (PMC Pune Cycle Rally)
पुणे मनपा मुख्य भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे मनपा भवन येथे सायकल फेरीचा समारोप झाला. उत्साहाच्या वातावरणात विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांनी या सायकल फेरीत सहभाग घेतला. सहभागी सर्व सायकल स्वारांना पदक प्रदान करण्यात आले. (Pune Municipal Corporation)
सायकल फेरीचे नेतृत्व पुणे मनपा सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी (PMC Cycle Club co-ordinator Suresh Pardeshi) यांनी केले. महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार (Neha Bhavsar) यांनी केले.
यावेळी मनपा उपायुक्त चेतना केरुरे, माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे , अधीक्षक अभियंता राजेंद्र तांबे, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000
News Title | PMC Pune Cycle Rally | 2 thousand 200 citizens participated in the bicycle round of Pune Municipal Corporation | Organized bicycle tour in the background of G-20 meeting