PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत! 

HomeपुणेBreaking News

PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत! 

Ganesh Kumar Mule Jul 29, 2023 2:04 PM

Computer Operator Promotion | PMC | संगणक ऑपरेटर पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन | 31 जुलै पर्यंत अर्ज घेता येणार | 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार
PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव
Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023 | पुणे महापालिका भरती परीक्षा | उद्या ५ शहरात होणार परीक्षा 

PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत!

PMC Pune Bharti | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून नुकतीच 448 पदांची भरती करण्यात आली होती. यात  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व लिपिक टंकलेखक या हुद्यावर सरळसेवा भरती करून सेवकांना नियुक्त करण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांनी 6 महिने उलटूनही महापालिकेच्या अटींची पूर्तता केलेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आता सामान्य प्रशासन विभागाने कडक पाऊल उचलले आहे. याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखावर सोपवली असून माहिती देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (PMC Pune Bharti)

नवनियुक्त  सेवकांची नेमणूक महानगरपालिका सेवाविनियमातील क्र. १० (अ) नुसार दोन वर्षासाठी परिविक्षाधीन पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यानुसार सेवकांना पुणे महानगरपालिकेकडे रुजू करून घेताना आज्ञापत्रात नमूद अटींच्या अधीन राहून रुजू करून घेतलेले असूनही सेवकांनी सहा महिने होऊनही अद्याप अटींची पूर्तता न केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे
वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation)

त्यामुळे संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सरळसेवेने भरती करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व लिपिक टंकलेखक हुद्यावरील सेवकांची म माहिती भरून द्यावयाची आहे. तसेच माहितीच्या अनुषंगाने सदर सेवकाच्या कागदपत्रांच्या प्रती संकलित करावयाच्या आहेत. तसेच परिविक्षाधीन कालावधीतील सहा महिन्याचे मूल्यमापन करून एकत्रितपणे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावयाचे आहे. १५ दिवसाच्या मुदतीत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावे. असे आदेश उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. (PMC Pune News)
—-/
News Title |PMC Pune Bharti | Pune Municipal Recruitment | Even after 6 months, the newly appointed employees have not fulfilled the conditions!