PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या ई लर्निंग स्कुल मध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांसाठी भरती!
| 8 ते 14 जून पर्यंत करू शकता अर्ज
पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, या सी.बी.एस.ई. बोर्ड मान्यता प्राप्त कायम विनाअनुदानीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी एकवट मानधनावर करार पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. ह्या नियुक्त्या दरमहा एकवट मानधनवर नेणूका करणेत येणार आहेत. उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ८ ते १४ जून, २०२३ या कालावधीत शासकीय सुट्टी वगळून राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे ४११००९ येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या वेळेत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Pune recruitment 2023)
२) सर्वसाधारण खुल्या गटासाठी वयो र्गादा ही ४० वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांस शासकीय नियमानुसार वयो र्गादा ही ४५ वर्षे राहील.
३) मागासवर्गीय उमेदवारांच्या नावाचा जातीचा दाखला व वैधताप्रमाणपत्र असणे आवश्यक.
४) या जाहिर प्रकटनातील शिक्षक पदासमोर दर्शविण्यात आलेल्या दरमहा एकवट मानधन करार पध्दतीने सहा महिने मुदतीसाठी शैक्षणिक मेरीट / गुणात्मक्तेने नेणूकीसाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक ८ ते १४ जून, २०२३ या कालावधीत राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे ४११००९ येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी ८ ते ११ ते दुपारी ३ पर्यंत या वेळेत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
५) अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रमाणीत केलेल्या छायामुद्रांकीत/ झेरॉक्स प्रती जोडण आवश्यक आहे. तसेच अर्ज पडताळणीसाठी सर्व छायामुद्रांकीत प्रतींच्या मूळ प्रती दाखविणेआवश्यक असल्याने येताना त्या घेऊन याव्यात. अपूर्ण अर्ज असल्यास बाद करणेत येऊन तो कार्यालयीन कागदपत्र म्हणून जमा करणेत येईल.
६) उमेदवार निवडीचे आणि काही कारणाने कोणताही बदल करण्याचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्तांना आहेत.
७) उमेदवार निवडीसाठी कोणताही राजकीय, पदाधिकारी, अधिकारी यांचा दबाव आणल्यास सदर उमेदवारास अपात्र ठरविले जाईल याची नोंद घ्यावी.
८) निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक ही करारपध्दतीने एकवट मानधनावर आणि ठराविक मुदतीसाठी आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार असून उमेदवारास कोणत्याही स्वरुपाचे कायम नेणुकीविषयी हक्क सांगता व मागता येणार नाही. तसेच नियमित सेवकाचे कोणतेही फायदे लागू राहणार नाही. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)