PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा
| भरतीबाबत महापालिका प्रशासनाकडून उमेदवारांना आवाहन
दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये
महापालिकेच्या आवाहनानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी (Pune Mahanagarpalika Bharti 2023) वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांत सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येऊन कर्मचारी निवड समितीच्या अहवालानुसार पारदर्शकरीत्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. याद्वारे सर्व नागरिकांना/उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित व्यक्तींशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरूपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. (PMC Pune Recruitment 2023)