PMC Pune Anniversary | महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द  | महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक घेण्यात आले मागे 

PMC Pune Building

Homeadministrative

PMC Pune Anniversary | महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द  | महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक घेण्यात आले मागे 

Ganesh Kumar Mule Feb 06, 2026 12:03 PM

Sharad Pawar NCP | आमचं नाव आमचं चिन्ह म्हणजे शरद पवार | निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी | प्रशांत जगताप 
ST workers : Ajit pawar : आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना सांगायचो… अजित पवार म्हणाले…
Old Pension Scheme | निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार | त्यानंतरच्या कालावधीत रूजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

PMC Pune Anniversary | महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द!  | महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक घेण्यात आले मागे

 

 

PMC Labour Welfare Department – (The Karbhari News Service) –  १५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका वर्धापन दिननिमीत्त  सांस्कृतिक कलामंचातर्फे आयोजित सांस्कृतिक  कार्यक्रम कामगार कल्याण विभागाच्या वतीने रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांच्या आयोजना बाबत प्रसार माध्यमातून टीका करण्यात आली होती. त्यामुळे याबाबतचे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका आपला वर्धापन दिन साजरा करते. त्यानिमित्ताने दरवर्षी  पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त अधिकारी / सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  यामध्ये नृत्य (वैयक्तिक व समुहनृत्य), नाटक, ऑर्केस्ट्रा (हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रम), वादन, वैयक्तिक कलागुण व छायाचित्र / हस्तचित्र / कलाकृती प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कामगार कल्याण विभागाकडून याबाबत पुढाकार घेतला जातो. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नावे नोंदवण्यास सांगितले जाते. यावर्षी देखील नुकतेच याचे परिपत्रक कामगार कल्याण विभागाकडून जारी करण्यात आले होते. यावरून महापालिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

याला कारण असे कि, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. असे असताना सांस्कृतिक कार्यक्रम महापालिका कशी घेऊ शकते, असा सवाल प्रसार माध्यमांनी केला. यामुळे हा विषय चर्चेचा झाला. याची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच याबाबतचे परिपत्रक देखील मागे घेतले आहे.


 

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त अधिकारी आणि  सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार याबाबतचे परिपत्रक आम्ही जारी केले होते. मात्र आम्ही आता हे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच याबाबतचे विभागाकडून जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे घेतले आहे.

| नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी तथा अध्यक्ष, पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंच पुणे महानगरपालिका.

 

———-

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कै. सन्माननीय अजित दादा पवार यांचे दुःखद निधन झाले असल्याने पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत.

| तुषार बाबर, उपायुक्त, माहिती व जनसंपर्क कार्यालय


दरवर्षीच्या नित्यनियमा प्रमाणे महापालिका प्रशासनाकडून सांस्कृतिक कार्यक्रमा बाबत परिपत्रक जारी केले होते. मात्र आमच्या लक्षात आल्यानंतर महापौर आणि मी मिळून हा विषय थांबवण्यास सांगितले. त्यानुसार कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आता १५ तारखेला जो वर्धापन दिन निमित्त चहा पानाचा कार्यक्रम असतो, त्याबाबत अजून काही दिशा ठरलेली नाही. आम्ही चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ.

-| गणेश बिडकर, गटनेते, भाजप, पुणे महापालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: