PMC Property Tax | मिळकत करात 40% सवलत नेमकी कुणाला मिळणार? कुणाची सवलत रद्द होणार? | जाणून घ्या सर्व काही

HomeपुणेBreaking News

PMC Property Tax | मिळकत करात 40% सवलत नेमकी कुणाला मिळणार? कुणाची सवलत रद्द होणार? | जाणून घ्या सर्व काही

Ganesh Kumar Mule May 08, 2023 2:52 PM

Pune Traffic Update | १४ व १५ डिसेंबर रोजी सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद
Nehru Stadium | पुणे महापालिकेच्या नेहरू स्टेडियमला ‘बॉलिवूड’ ची पसंती | तब्बल 6 दिवस चालले सिनेमाचे शूटिंग
Gauri Ganpati Decoration Competition | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”

PMC Property Tax | मिळकत करात 40% सवलत नेमकी कुणाला मिळणार? कुणाची सवलत रद्द होणार? | जाणून घ्या सर्व काही

PMC property Tax |   पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे. (PMC property Tax)

वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3 application form) संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (Pune property tax)