PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा

HomeBreaking Newsपुणे

PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा

Ganesh Kumar Mule Jun 20, 2023 4:41 AM

Ajit Deshmukh PMC | उपायुक्त अजित देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ!
PMC Property Tax Department | पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा दिलासा | सवलतीत कर भरण्याची मुदत वाढवली
Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार 

PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा

PMC Property Tax | कर आकारणी व करसंकलन विभागाकडून (PMC Property Tax Department) मे महिन्यापासूनच थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकतीवर (Commercial Properties) सिलिंग कारवाई (Sealing Action) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. एका महिन्यात ४०० हून
अधिक बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. यापुढेही थकबाकी असलेल्या मिळकतीवर सिलिंग कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (PMC Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व मिळकतधारकांना (Pune Property Holder) आवाहन महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सन २०२३-२४ ची देयके (PMC Property Tax bill) वितरीत करण्यात आली असून ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. (PMC Pune News)

१५ मे २०२३ ते दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर भरल्यास पुणे महानगरपालिकेकडून र. रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५ पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल फोन, १० लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना प्राप्त होतील. लॉटरी योजनेचा लाभ घेणेसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही केवळ आपला संपूर्ण मिळकतकर दि. १५ मे २०२३ ते  ३१ जुलै २०२३ ह्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Property Tax Lottery)
—-
News Title | PMC Property Tax |  Over 400 Property Seals |  Property tax department warns to step up action