PMC Property Tax | मिळकतकर विभागाने २९८५ कोटींचा टप्पा केला पार! | मागील वर्षी पेक्षा ६०० कोटींनी अधिक उत्पन्न
| साडे सात लाख लोकांनी घेतला ऑनलाईन प्रणालीचा फायदा
Pune Property Tax – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागाने इतिहासात प्रथमच २०२५ – २६ या आर्थिक वर्षात २९८५ कोटीचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षी विभागाला २३४६.१८ कोटी मिळाले होते. मागील वर्षी पेक्षा ६०० कोटींनी अधिक उत्पन्न विभागाने मिळवले आहे. तर साडे सात लाख लोकांनी ऑनलाईन प्रणालीचा फायदा घेतला आहे, अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (Ravi Pawar PMC Deputy Commissioner)
पुणे महानगरपालिका हद्दीत एकूण मिळकतींची संख्या १४ लाख ९७ हजार इतकी आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ अखेर (सायंकाळी ७ वाजेपर्यंत) ११ लाख ३३ हजार इतक्या मिळकतधारकांनी २९८५.६७ कोटी इतका मिळकतकर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे.
यामध्ये १.२८ लाख (११.३५%) इतक्या मिळकतधारकांनी ९८५.२५ कोटी इतकी रक्कम धनादेशाद्वारे जमा केलेली आहे. तर २.५३ लाख (२२.४१%) इतक्या मिळकतधारकांनी ४०९.६६ कोटी इतकी रोख रक्कम स्वरूपात जमा केलेली आहे. तसेच सर्वाधिक ७.५० लक्ष (६६.२४%) इतक्या नागरिकांकडून online / digital प्रणालीद्वारे १५९०.७६ कोटी जमा करण्यात आले आहेत.
वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण १० लाख ९५ हजार मिळकतधारकानी २३४६.१८ कोटी मिळकतकर जमा केला होता.
पुणे महानगरपालिकेतर्फे १५ नोव्हेंबर २०२५ पासून अभय योजना लागू करण्यात आली होती, अभय योजना कालावधीत १,६४,६६५ मिळकतधारकांनी ९५४.७८ कोटी इतका मिळकतकर जमा केला आहे. असे रवी पवार यांनी सांगितले.

COMMENTS