PMC Property Tax Department | नियमानुसार ३ वर्षांनी बदली होऊन पुन्हा तेच तेच कर्मचारी प्रॉपर्टी टॅक्स विभागात घेण्याचे प्रयोजन कशासाठी? | माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा महापालिका आयुक्तांना सवाल!

Homeadministrative

PMC Property Tax Department | नियमानुसार ३ वर्षांनी बदली होऊन पुन्हा तेच तेच कर्मचारी प्रॉपर्टी टॅक्स विभागात घेण्याचे प्रयोजन कशासाठी? | माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा महापालिका आयुक्तांना सवाल!

Ganesh Kumar Mule Sep 29, 2025 2:19 PM

Sachin Adekar Congress | आपली खासदारकी पणाला लावून खरे बोलल्या बद्दल मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन | सचिन आडेकर 
PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेतील डायलिसिसचे दर निश्चित नसल्याने महापालिका आणि रुग्णांचे नुकसान
Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

PMC Property Tax Department | नियमानुसार ३ वर्षांनी बदली होऊन पुन्हा तेच तेच कर्मचारी प्रॉपर्टी टॅक्स विभागात घेण्याचे प्रयोजन कशासाठी?

| माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा महापालिका आयुक्तांना सवाल!

PMC Employees Transfer – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनातील  प्रशासन अधिकारी, अधिक्षक, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्या दर ३ वर्षांनी नियमाप्रमाणे बदली झाली असताना पुन्हा कर आकारणी आणि कर संकलन कार्यालयाकडे पुन्हा तेच तेच कर्मचारी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र हे नियमाला धरून नाही, ही गोष्ट माजी आमदार आणि शिवसेना नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune) यांनी महापालिका आयुक्त यांच्या लक्षात आणून दिली आहे. तसेच याची सखोल चौकशी करून, कायद्यातील नियमानुसार, धोरणानुसार व नैसर्गिक न्यायानुसार विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य त्या सेवकांची कर आकारणी कर संकलन कार्यालयामध्ये नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी धंगेकर यांनी महापालिका आयुक्त रविंद्र धंगेकर यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

धंगेकर यांच्या पत्रा नुसार पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या अधिकारी कर्मचारी यांची दर ३ वर्षांनी बदली करण्याचे राज्य शासन व पुणे मनपाचे धोरण आहे. यानुसार सन २०२१ ते सन २०२४ पर्यंत प्रशासन अधिकारी, अधिक्षक, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कर आकारणी कर संकलन कार्यालयामधील प्रशासन अधिकारी, अधिक्षक, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्या बदल्या होऊन चार ते पाच वर्षे किंवा काही अधिकाऱ्यांना ३ वर्षे देखील पूर्ण झालेली नाहीत. अशा अधिकाऱ्यांना “अनुभवी सेवक म्हणून” वरीष्ठ अधिकारी यांच्या मर्जीनुसार कर आकारणी कर संकलन विभागाकडे पुन्हा घेण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.

परंतु आम्ही आपणास निदर्शनास आणून देत आहोत कि, प्रशासन अधिकारी, अधिक्षक, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक हे सेवक यापूर्वी कर आकारणी कर संकलन कार्यालयात ज्यु.ग्रेड.लेखनिक, सिनियर ग्रेड लेखनिक, हेड क्लार्क, अधिक्षक, प्रशासन अधिकारी म्हणून १५ ते २० वर्षे त्याच खात्यात प्रमोशन घेऊन काम करीत होते. म्हणजेच त्यांची बदली कर आकारणी विभागातून १५ ते २० वर्षांनी झाली आणि आता त्याच सेवकांना प्रशासन घेण्यास इच्छुक आहे.

वास्तविक मनपाचे धोरण व राज्य शासनाचे धोरणानुसार प्रत्येक खात्यातील सेवकांची दर ३ वर्षांनी वेगवेगळ्या मनपातील खात्यांमध्ये बदली होणे आवश्यक आहे. परंतु या हुद्द्यांचे काही सेवक फक्त टॅक्स विभागातच काम करण्यास इच्छुक असतात. त्यांना फक्त टॅक्स विभागातच काम करायचे असते हे आपल्या लक्षात आणून देत आहोत. असे देखील धंगेकर यांनी म्हटले आहे.

परंतु आता वरीष्ठ अधिकारी यांच्या मागणीनुसार त्याच त्याच सेवकांना पुन्हा कर आकारणी कर संकलन विभागाकडे घेण्याचे कारण काय ? यामध्ये आपण स्वतः जातीने लक्ष घालून अनुभवी सेवक म्हणून तेच तेच सेवक का घेत आहेत याचा शोध घ्यावा. नियमानुसार व धोरणानुसार सर्व सेवकांना मनपाच्या प्रत्येक खात्यामध्ये बदलीने काम करणे बंधनकारक आहे. तरी, आमच्या  मुद्द्यांचा सखोल चौकशी करून, कायद्यातील नियमानुसार, धोरणानुसार व नैसर्गिक न्यायानुसार विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य त्या सेवकांची कर आकारणी कर संकलन कार्यालयामध्ये नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0