PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करण्याचा मोह सुटेना | 5-6 वर्ष  खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस

HomeपुणेBreaking News

PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करण्याचा मोह सुटेना | 5-6 वर्ष खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस

Ganesh Kumar Mule Oct 18, 2023 1:14 PM

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!
G-20 Summit Pune | जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
Meri Mati Mera Desh | PMC Pune | ‘माझी माती माझा देश’ उपक्रम अंतर्गत 11 हजार वृक्षांची लागवड | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करण्याचा मोह सुटेना | 5-6 वर्ष  खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस

PMC Property Tax Department ( https://propertytax.punecorporation.org/) पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाला (Pune Municipal Corporation Property tax Department) टॅक्स वसूलीसाठी अतिरिक्त 150 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील बरेच कर्मचारी हे टॅक्स विभागात पहिल्यांदाच काम करण्यासाठी येताहेत. यामुळे एकीकडे आयुक्तांनी हा चांगला निर्णय घेतला, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे 5-6 वर्ष  प्रॉपर्टी टॅक्स खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस लागून राहिलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र आयुक्तांचा हा निर्णय चांगलाच झोंबलेला दिसतो आहे. कारण हे कर्मचारी आयुक्तांच्या या निर्णयाबाबत नाखूष आहेत.

 पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाला (Pune Municipal Corporation Property tax Department https://propertytax.punecorporation.org/ ) टॅक्स वसूलीसाठी अतिरिक्त 150 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  काही दिवसापूर्वी 30 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले होते. तर आज अजून 120 कर्मचारी असे एकूण 150 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही 31 मार्च पर्यंत असणार आहे. महापालिका  आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Property Tax)

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1500 कोटी पर्यंत  उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त टॅक्स वसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी खात्याला 100 ते 150 कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.  (PMC Pune Property tax Department)

आयुक्तांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. कारण वर्षानुवर्षे एकाच खात्यात काम केल्याने कर्मचाऱ्यांची मक्तेदारी तयार होते. हीच मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम महापालिका आयुक्तांनी केले आहे. शिवाय नवीन कर्मचाऱ्यांना टॅक्स खात्यात काम करायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांना नवीन काही शिकायला मिळणार आहे. असे असले तरी नेहमी टॅक्स विभागात काम करण्याची सवय लागलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र आयुक्तांचा हा निर्णय पचनी पडलेला दिसत नाही. 6 वर्ष टॅक्स विभागात काम करूनही या कर्मचाऱ्यांना टॅक्स विभागाचा मोह सुटत नाही. त्यांना आस होती कि आपली बदली केली असली तरी पुन्हा आपल्यालाच खात्यात काम करण्यास घेतले जाईल. मात्र आयुक्तांनी असे काही केले नाही. नवीन कर्मचाऱ्याचा जास्त वेळ शिकण्यात जाईल. त्यामुळे वसुलीवर परिणाम होईल. आम्ही घेतलेल्या ज्ञानाचा फायदा पालिकेला का घेता येऊ नये? अशी चर्चा हे कर्मचारी करत आहेत.
——