PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागला लवकरच मिळणार 200 कर्मचारी!

HomeBreaking Newsपुणे

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागला लवकरच मिळणार 200 कर्मचारी!

गणेश मुळे Jun 13, 2024 2:41 PM

PMC Property Tax Survey | | प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे काम मिळाल्याचा आनंद; मात्र सर्व्हेच्या कामात मात्र कर्मचाऱ्यांची उदासीनता! | 15 दिवसांत फक्त 20 हजार घरांचा सर्वे 
Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न 
Pune Property tax Department | पुणे महापालिका आयपीसी कलम १३८ चा करणार वापर | जाणून घ्या कुणा विरुद्ध वापरले जाते कलम आणि शिक्षा!

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागला लवकरच मिळणार 200 कर्मचारी!

| शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे!

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) प्रायोगिक तत्वावर तपासणी मोहीम सुरु करण्यात आली होती. त्याचा आधार घेऊन आता संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 4 लाख मिळकतींचा सर्वे केला जाणार आहे. त्यासाठी विभागाने अतिरिक्त 500 कर्मचारी देण्याची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानुसार आता लवकरच पहिल्या टप्प्यातील 200 कर्मचारी विभागाला मिळणार आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (PMC Property tax Department)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्व-वापराच्या निवासी मिळकतीस 40% सवलतीच्या अनुषंगाने वडगाव धायरी, वडगाव बुद्रुक व हिंगणे या भागात प्रायोगिक तत्वावर 6 मे पासून भेट देण्यात आली होती. मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, त्यांचेकडून 40%  सवलतीचा PT-3 form नागरिकांना हस्तांतरित करण्यात आला.  मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, याबाबत मिळकतधारकांनी PT 3 form भरताना सादर केलेल्या कागद पत्रानुसार तपासणी करण्यात येत होती.
याचाच आधार घेऊन आता पुणे महापालिका पूर्ण शहरभर ही तपासणी मोहीम राबवणार आहे. यात नागरिकांकडून तात्काळ PT 3 भरून घेण्यात येणार आहे. घरात स्वतः राहत असल्यासच मिळकतधारकाला सवलत मिळणार आहे. असे जगताप यांनी सांगितले. जगताप यांनी सांगितले कि, नागरिकांसाठी ही शेवटची सवलत असणार आहे. यानंतर PT 3 form भरण्याची संधी दिली जाणार नाही. विविध विभागातील 500 कर्मचारी यासाठी घेतले जाणार आहेत. मात्र सध्यातरी विभागाला 200 कर्मचारी सामान्य प्रशासन विभागाकडून दिले जाणार आहेत. याचे नियोजन तयार झाले असून लवकरच हे कर्मचारी विभागाकडे रुजू होणार आहेत.

| लवकरच बँड पथकाच्या माध्यमातून वसुली

मिळकतकर विभागाने वसुलीवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. कर्मचारी मिळाल्यानंतर वसुलीवर भर देण्यात येणार आहे. तसेच बँड पथकाच्या माध्यमातून देखील वसुलीला सुरुवात केली जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त मिळकतीचे मूल्यमापन करून कर लावला जाणार आहे.