PMC Property Tax Department | उपायुक्त अजित देशमुख यांची प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी धडक मोहीम | जागेवर जाऊन केली व्यावसायिक मिळकतींची तपासणी
PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स (PMC Property Tax) हा महापालिकेचा उत्पनाचा महत्वाचा स्रोत आहे. मात्र 40% सवलतीच्या (40 Discount on property Tax) प्रक्रियेमुळे टॅक्स वसुलीला गती मिळताना दिसत नाही. त्यामुळे विभागप्रमुख तथा उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी स्वतः फिल्डवर उतरत व्यावसायिक मिळकतीची (Commercial Properties) तपासणी सुरु केली आहे. मंगळवारी नर्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील २५ व्यावसायिक मिळकतींची तपासणी करण्यात आली. यावेळी थकबाकी असणाऱ्या मिळकती सील केल्या तर काही मिळकत धारकांनी जागेवर प्रॉपर्टी टॅक्स भरला. (PMC Property Tax Department)
पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग (PMC Pune Property Tax Department) हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेस (Pune Municipal Corporation) जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होण्याच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, सिलिंग व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. (PMC Pune)
मंगळवारी अजित देशमुख, उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन तसेच राजेश कामठे, प्रशासन अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पथकासह सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धायरी, वडगाव बुद्रुक · वडगाव खुर्द, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे या ठिकाणी २५ मिळकतींना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सदर तपासणी दरम्यान अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती, रूफ टॉप, साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन असलेल्या मिळकती शोधण्यात आल्या. तसेच थकबाकी असल्यास, धनादेश प्राप्त करण्यात आले किंवा मिळकती सील करण्यात आल्या. तसेच आकारणी न झालेल्या मिळकतींची तपासणी करण्यात आली. हॉटेल साईड मार्जिन, टेरेसचा वापर व अनधिकृत गोडाऊन व औद्योगिक मिळकतींच्या आकारानींची तपासणी करण्यात आली. (Pune Property Tax)
अशी केली कारवाई
त्रिमूर्ती इंजिनियरिंग, नर्हे या मिळकतीवर अंदाजे २० हजार स्क्वेअर फुटाचे आकारणी न झालेले गोडाऊनची आकारणी करण्यात आली. आंबेगाव च्या हॉटेल वेदांत येथे फ्रंट मार्जिन व रूफ टॉप येथे तपासणी दरम्यान अनधिकृत वापर सुरु असल्याने, त्याची आकारणी तीन पटीने करण्याचे आदेश देण्यात आले. हॉटेल विठ्ठल आंबेगाव बुद्रुक येथे ३० लाख थकबाकी असल्यामुळे सील करण्यात आले. सील करतेवेळी रक्कम ३० लाखांचा धनादेश प्राप्त. धायरीतील हॉटेलवर रक्कम रु. ३१ लाख ३९ हजार इतकी थकबाकी असल्यामुळे मिळकत सील करण्यात आली. धायरीतील हॉटेलवर मिळकत सीलींगची कारवाई करते वेळी रक्कम रु.२ लाखांचा पुढील तारखेचा धनादेश प्राप्त झाला. धायरीतील गोडाउनवर अंदाजे १४,००० स्क्वेअर फूट अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन MSEB च्या पुरवठा दिनांकानुसार सन २०१९ पासून सुरु असल्याने अनधिकृत बांधकामाची तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
या पुढेही संपूर्ण शहरात अशाच प्रकारे प्रत्यक्ष भेटी देऊन, मिळकतींच्या आकारणीची तपासणी करून वाढीव बांधकाम, अनधिकृत वापर व आकारणी न झालेल्या मिळकतींची आकरणी करणे, थकबाकी वसुली व सीलींग करणेची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. असे कर आकारणी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (Pune Property tax News)
——
News Title | PMC Property Tax Department | Deputy Commissioner Ajit Deshmukh’s campaign for property tax collection Went to the place and checked the commercial income