PMC property Tax Department | टॅक्स विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वशिलेबाजीने 

HomeBreaking Newsपुणे

PMC property Tax Department | टॅक्स विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वशिलेबाजीने 

Ganesh Kumar Mule May 09, 2023 12:56 PM

MP Suspension | Pune Congress | १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण | अरविंद शिंदे
PMC Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप
Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

PMC property Tax Department | टॅक्स विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वशिलेबाजीने

| काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप

PMC Property Tax department | महापालिकेच्या (PMC Pune) मिळकतकर विभागात प्रशासन अधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आलेले राजेश कामठे (Rajesh Kamthe), रविंद्र धावरे (Ravindra Dhavre) यांच्या नियुक्त्या वशिले बाजीने करण्यात आल्या असल्याचा आरोप काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress city president Arvind Shinde) यांनी केला आहे. तसेच  लेखनिक संवर्गातील इतर प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक यांच्या बदल्या वशिले बाजीने झाल्या असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे या बदल्या नैसर्गिक न्यायाने कराव्यात अशी मागणी शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC Pune Tax department)
अरविंद शिंदे यांच्या पत्रानुसार महापालिकेत  एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये फक्त २०% बदल्या करण्यात आलेल्या आहेत. २०% बदली सूत्रात चलाखगिरी करून बचावलेले कर निरीक्षक व इतर अधिकारी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय दबाव आणलेला आहे. २०% बदली सूत्रात मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी व आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची चर्चा मनपा कर्मचारी उघड उघड करीत आहेत. यामध्ये देखील अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी तसेच जाणीवपूर्वक केलेल्या चुका आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. (PMC Pune Employees)
1) अधिक्षक पद हे पद २०% नियतकालिक बदल्या यामध्ये घेण्यात आलेले नाही.
पुणे मनपा कार्यक्षेत्रात सन १९९७-९८ मध्ये २३ गावे समाविष्ट करण्यात आली. सदर गावातील ग्रामपंचायतीमधील सेवकवर्ग पुणे मनपा प्रशासनात सामावून घेण्यात आला होता. त्या सेवकांमधील ज्यु.ग्रेड.लेखनिक राजेश कामठे यांची कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे नेमणूक करण्यात आली. ते आजतागयात कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे पदोन्नती घेऊन अधिक्षक या पदावर व खात्यात अंदाजे २० वर्ष काम करीत आहेत.
कर आकारणी कर संकलन कार्यालयात दोन महापालिका सहाय्यक आयुक्त(वर्ग-१) व तीन प्रशासन अधिकारी (वर्ग२) कार्यरत होते, असे असतानाही तत्कालीन उप आयुक्त तथा कर आकारणी कर संकलन प्रमुख यांनी  कामठे (अधिक्षक) यांना प्र.प्रशासन अधिकारी या पदाचा पदभार दिला. वर्ग १ मधील दोन व वर्ग २ मधील तीन अधिकारी असताना प्र.प्रशासन अधिकारी म्हणून कामठे l यांचे पद अधिक्षक असताना त्यांना पदभार देण्याचे प्रयोजन काय ? हि बाब अत्यंत गंभीर आहे. असे असतानाही त्यांची बदली २०% नियतकालिक बदल्या यामध्ये का घेण्यात आली नाही. हि बाब अतिरिक्त आयुक्त (ज) यांच्या मान्यतेने अथवा उप आयुक्त, सामान्य प्रशासन यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे का ? याची संपूर्ण माहिती देण्यात यावी. (PMC Pune News)
कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे सन २०२१-२२ या काळात कुलकर्णी, सातपुते, वाघमारे  हे अधिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्यांची ६ महिन्याच्या आत अन्य खात्यात बदली करण्यात आली व  कामठे सन १९९७ पासून कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे कामास आहे. त्यांची बदली न करता वरील सेवकांची बदली करणे अन्यायकारक वाटत नाही का ? या सर्व बाबी आमच्या पर्यंत येतात परंतु, आपणापर्यंत येत नाही हि खेदाची बाब आहे.
2) प्रशासन अधिकारी यांची अन्य खात्यामध्ये बदल्यांबाबत
पुणे महानगरपालिकेचे सेवांचे वर्गीकरण (Classification of Services)
१) प्रशासकीय सेवा २)लेख सेवा ३)अभियांत्रिकी आणि तांत्रिक सेवा ४)वैद्यकीय सेवा ५)निम वैद्यकीय सेवा ६)अग्निशामक सेवा अशा प्रकारे मनपाचे सेवकांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यामधील प्रशासकीय सेवा – महानगरपालिका सचिवालय अंतर्गत असलेल्या विभागातील सेवा या “प्रशासकीय सेवा” म्हणून संबोधण्यात येतात. श्रेणी-२ लघुलेखक हा नगरसचिव कार्यालयात प्रशासकीय सेवा मध्ये येतो. परंतु त्याचे काम हे लघुलेखक पदाचे आहे. म्हणजे त्याची मनपा प्रशासनामध्ये बदली करताना लघुलेखक पदावर होणे आवश्यक आहे. अथवा वेतनास नगरसचिव विभाग व प्रत्यक्ष कामास अन्य विभागात लघुलेखक म्हणून बदली होणे आवश्यक आहे. परंतु श्री.रवींद्र धावरे यांची कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे प्रशासन अधिकारी (वर्ग-२) या पदावर कोणत्या नियमाने अथवा कायद्याने प्रत्यक्ष कामास बदली केली व गेली ६ ते ७ वर्ष नेमणूक करण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती देण्यात यावी. (Pune Municipal Corporation (PMC))
तसेच  रवींद्र धावरे लघुलेखक यांची नगरसचिव कार्यालयाकडे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५३ (२) अन्वये नेमणूक झाली असेल तर सदर सेवक मनपा प्रशासनामध्ये प्रशासन अधिकारी (वर्ग-२) म्हणून कसा नेमला जाऊ शकतो ? श्री.रवींद्र धावरे सन २०१२ ते २०१६ दरम्यान प्रत्यक्ष कामास कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे व वेतनास अन्य खात्यात होते, नंतर नगरसचिव विभागाकडे लघुलेखक (वर्ग-२) म्हणून त्यांची शेड्यूल मान्य जागेवर निवड श्रेणीतून नेमणूक करण्यात आली. तदनंतर सन २०१७-२०१८ पासून ते आजपर्यंत प्र.प्रशासन अधिकारी म्हणून त्यांना पदभार देण्याचे प्रयोजन काय ? हि बाब अत्यंत गंभीर आहे. प्रशासकीय सोयीसाठी बदली करावयाची असेल तर त्यांची मा.महापालिका आयुक्त, मा.अति.महा.आयुक्त (ज,ई,वि) इत्यादी. मनपा विभागाकडील लघुलेखक (वर्ग-२) या पदावर करणे आवश्यक होते.
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि,  दोन महापालिका सहाय्यक आयुक्त(वर्ग-१) व तीन प्रशासन अधिकारी (वर्ग-२) कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे कार्यरत असताना श्री.रवींद्र धावरे यांची नेमणूक शंकास्पद वाटते. अति.महा.आयुक्त (ज) यांना त्यांच्या नियंत्रणाखालील सामान्य प्रशासन सेवक वर्ग विभाग यांनी दिलेली आहे का ? त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. तसेच आमची आपणास अशी विनंती आहे कि, मनपा प्रशासानाकडील सर्व लघुलेखक वर्ग २ व वर्ग ३ यांची एका खात्यामध्ये ३ वर्ष पूर्ण झाली असल्यास त्वरित बदल्या करण्यात याव्यात. तसेच २०% बदलीचे सूत्रात लघुलेखक वर्ग २ व वर्ग ३ हे पद घेतले आहे का ? नसल्यास का घेतले नाही ?
3) कर आकारणी कर संकलन कार्यालयात कामास व प्रत्यक्ष वेतनास अन्य खात्यात आजही असणारे सेवक
कर आकारणी कर संकलन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष कामास व वेतनास स्थानिक संस्था कर(LBT)  विभागाकडे असेलेले अधिकारी उदा.आकारणी विभाग प्रमुख, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक इत्यादी महत्वाच्या पदांवर गेले ६ ते ७ वर्षे कामकाज करीत आहेत. त्यांची बदली त्वरित अन्य खात्यामध्ये करण्यात यावी. स्थानिक संस्था कर (LBT) विभागाकडे कामकाज नसतानाही त्या विभागात अधिकारी कर आकारणी कर संकलन विभागाकडे काम करणेची संधी मिळते म्हणूनच जाणीवपूर्वक (LBT) विभागाकडे बदली करून घेतात. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाची भूमिका वादग्रस्त आहे.
4) प्रशासकीय संवर्गातील वरिष्ठ लिपिक कर्मचारी यांची १७/०४/२०२३ रोजीची पदस्थापना नियुक्तीबाबतचे आज्ञापत्र.
पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील वरिष्ठ लिपिक या हुद्द्याचे सेवकांची आज्ञापत्र जा.क्र.अतिमआ/साप्रवि/आस्था-४/१०१६८ दि.४/३/२०२२ या तात्पुरत्या पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली होती. ते सेवक पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. त्यानुसार आज्ञापत्र जा.क्र.अतिमआ/साप्रवि/आस्था- ४/४३१ दि.१७/०४/२०२३ रोजी वरील सेवकांची पदस्थापना करण्यात आली.
प्रत्यक्ष काम कर आकारणी कर संकलन कार्यालय व वेतनास अन्य खात्यात यांची बदली स्थानिक संस्था कर (LBT) विभागात करण्यात येणार नाही असे मा.अति.महा.आयुक्त (ज) यांनी सुरुवातीस सभागृहात ठासून सांगितले होते. परंतु त्यांची पदस्थापना करताना पुन्हा स्थानिक संस्था कर(LBT)  विभागात मा.अति.महा.आयुक्त(ज) यांच्या स्वाक्षरीने आज्ञापत्रकाद्वारे पदस्थापना करण्यात आली. उदा.आज्ञापत्रकामधील अ.क्र.४३ व ५६ हे सेवक वेतनास स्थानिक संस्था कर कार्यालय व प्रत्यक्ष काम कर आकारणी कर संकलन कार्यालयात कामास होते. तरी त्यांची पुन्हा बदलीने पदस्थापना स्थानिक संस्था कर (LBT) विभागाकडे करण्यात आलेली आहे.
5) कर आकारणी कर संकलन कार्यालयातील उर्वरित सेवकांमधून ४० % सेवकांच्या बदली बाबत
सामान्य प्रशासन विभागाकडून दि.१७/०४/२०२३ रोजी २० % सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु जे सेवक सन २०१५ मध्ये कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे काम करीत आहेत त्याची बदली न होता सन २०१६ किवा त्यानंतर कर आकारणी कर संकलन कार्यालयात बदलीने अथवा प्रत्यक्षात नेमणूक झाली आहे अशा सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अशाच प्रकारे मनपा प्रशासनात इतर खात्यातही हा प्रकार घडला आहे. सदर प्रकार जाणीवपूर्वक काही मर्जीतील सेवकांसाठी करण्यात आलेला आहे का ? अशी शंका निर्माण होते. त्यासाठी कर आकारणी कर संकलन कार्यालाकडील व मनपा प्रशासनामधील इतर खात्यातील सेवकांना ३ वर्षापेक्षा जास्त काळ एका विभागात पूर्ण झाला असेल तर त्यांची बदली त्वरित करण्यात यावी.
आमचे १३/४/२०२३ चे आपणास “सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत केलेला स्टंट रोखून न्याय्य पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात” असे लेखी कळवूनही आमच्या पत्राची योग्य दखल न घेतल्याने अत्यंत चुकीच्या व गंभीर बाबी घडल्या असून इतर सेवकांवर अन्याय झाला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. हे आपणास या पत्राद्वारे कळवित आहे.  वरील मुद्द्याची त्वरीत दखल घेऊन मनपा प्रशासनामधील सर्व सेवकांना नैसर्गिक न्याय मिळेल अशा पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात व वरील मागण्यातील सत्यता, तथ्यता व आवश्यकता यांची पडताळणी दक्षता विभाग स्तरावरून करण्यात यावी. अशी मागणी अरविंद शिंदे, अध्यक्ष, पुणे शहर कॉंग्रेस कमिटी  यांनी केली आहे.
—-
PMC Property Tax Department |  Appointments of administrative officers in tax department by Vasilebaji  |  Allegation of Congress City President Arvind Shinde