PMC Property Tax Bills | PT ३ प्रोसेसिंग मध्ये विलंब आल्यामुळे मिळकत कराची बिले देण्यास मुदतवाढ!
| ५-१०% सवलतीस देखील मुदतवाढ
Pune Property Tax – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील निवासी, बिगरनिवासी तसेच मोकळ्या जागा यांना प्रत्येक वर्षी मिळकतकराची देयके अर्थात बिले (Pune Property Tax Bills) आर्थिक वर्षीच्या सुरवातीस पाठवण्यात येतात. तथापि, निवासी मिळकतधारकांबाबत उद्भवलेल्या करपात्र रकमेत देण्यात येणाऱ्या ४०% सवलतीच्या तसेच इतर मिळकतीना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ७ (१) नुसार देण्यात येणाऱ्या वजावटीबाबत अडचण निर्माण झाल्याने देयके देण्यास एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ५-१०% सवलतीस देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. मिळकत कर विभागाच्या या प्रस्तावाला नुकतीच महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation property tax Department)
१) सन २०२५-२६ च्या सर्व मिळकतींची देयके ३० एप्रिल अखेर तयार केली जातील. तसेच १ मे पासून पासून संगणकीय प्रणालीत दर्शवली जातील.
२) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १४० अ अन्वये विहित मुदतीत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकास सर्वसाधारण करात देण्यात येणारी ५% किंवा १०% सवलत देण्यात येते. त्या सवलतीचा कालावधी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात देयके बनविणेस विलंब असल्याने सवलत ही ३० जून अखेरपर्यंत दिली जाणार आहे.
३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम परिशिष्ठ ‘ड’ कराधान नियम प्रकरण ८ मधील नियम ४१ नुसार पहिल्या सहामाही कराची रक्कम बिल दिल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत न भरल्यास प्रथम सहामाहीस दरमहा २% शास्ती आकारण्यात येते. वरील बाबींचा विचार करिता प्रथम सहामाहीची २% शास्तीची आकारणी ०१ ऑगस्ट पासून करणेत येणार आहे.
COMMENTS