PMC Property Tax Abhay Yojana | दोन महिन्याच्या अभय योजनेतून महापालिकेला ७७३ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २५५८ कोटी 

Homeadministrative

PMC Property Tax Abhay Yojana | दोन महिन्याच्या अभय योजनेतून महापालिकेला ७७३ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २५५८ कोटी 

Ganesh Kumar Mule Jan 15, 2026 9:33 PM

PMC Pune News | अनधिकृत इमारतीत सदनिका विकत घेऊ नका – पुणे महापालिका बांधकाम विभागाचे आवाहन | कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई
Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा 
Mahila Ayog Aapalya Dari | “महिला आयोग आपल्या दारी” तीन दिवस पुणे जिल्ह्यात महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या

PMC Property Tax Abhay Yojana | दोन महिन्याच्या अभय योजनेतून महापालिकेला ७७३ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २५५८ कोटी

 

Pune Property tax – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या अभय योजना कालावधीत इतिहासात प्रथमच उच्चांकी ७७३.२५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली महापालिका मिळकत कर विभागाने केली आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात विभागाला २५५७.९५ कोटी महसूल मिळाला आहे. मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न २०० कोटींनी अधिक आहे. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (PMC Property Tax Department)

पुणे महानगरपालिका हद्दीत निवासी, बिगरनिवासी व मोकळ्या जागांची वर्षानुवर्षे मिळकत कर न भरल्याने थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच थकबाकी असलेल्या मिळकतींवर दरमहा आकारण्यात येणाऱ्या मिळकतींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, प्रकरण ८ नियम ४१ अन्वये २% शास्ती आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे मिळकतकराची थकबाकी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

नागरीकांची वाढती थकबाकी आणि मागणी पाहता महापालिका आयुक्त यांनी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या मिळकतकर थकबाकी असणा-या मिळकतदारांसाठी शास्ती /दंडाच्या रक्कमेवर ७५% सूट देणेकामी १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ अखेर “अभय योजना” जाहिर केली होती. अभय योजने अंतर्गत जास्तीत जास्त मिळकतकर जमा होण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत विशेष प्रयत्न करून उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत केले होते. आज अखेर एकूण  २५५७.९५ कोटी मनपा तिजोरीत जमा झाले आहेत. गत वर्षी ३१ मार्च २०२५ अखेर रक्कम रुपये २३४५.९० कोटी रुपये जमा झाले होते.

यापूर्वी वेळोवेळी जाहीर केलेल्या अभय योजने पैकी सन २०२०-२१ साली सर्वाधिक रक्कम रुपये ४८५.६७ कोटी जमा झाली होती. त्या  योजनेचा कालावधी चार महिन्यांचा होता. या वर्षी दोन महिन्यांचा अभय योजना कालावधीत सुमारे १.२४ लक्ष मिळकतधारकांनी  ७७३.२५ कोटी जमा केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: