PMC Primary Education Department | शारीरिक शिक्षण संघटक तथा क्रीडा अधिकारी पदाच्या जागा पदोन्नती ने भरल्या जाणार!

Homeadministrative

PMC Primary Education Department | शारीरिक शिक्षण संघटक तथा क्रीडा अधिकारी पदाच्या जागा पदोन्नती ने भरल्या जाणार!

Ganesh Kumar Mule Sep 16, 2024 5:14 PM

PMC Employees Union | PMPML | पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी बस सेवा सुरु
Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना | 14 मार्च च्या संपाला महापालिका कामगार युनियनचा पाठिंबा | मनपा कर्मचारी संपात सहभागी नसतील 
Biometric Machine | PMC Pune | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना लावाव्या लागताहेत रांगा |मशीन अचानक बंद पडत असल्याने कर्मचारी त्रस्त

PMC Primary Education Department | शारीरिक शिक्षण संघटक तथा क्रीडा अधिकारी पदाच्या जागा पदोन्नती ने भरल्या जाणार!

| महापालिका कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

PMC Sport Officer – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील शारीरिक शिक्षण संघटक तथा क्रीडा अधिकारी पदाच्या रिक्त ८ जागा पदोन्नती च्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (PMC Employees Promotion)

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे शारीरिक शिक्षण संघटक तथा क्रीडा अधिकारी हे पद आहे. या पदाच्या एकूण १५ जागा आहेत. त्यातील ७ जागा भरण्यात आल्या आहेत. रिक्त ८ जागा या पदोन्नती च्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. (Pune PMC News)

या पदासाठी सुधारित सेवा प्रवेश नियमावली नुसार नेमणुकीची पद्धत ठरवून देण्यात आली आहे. त्यात नामनिर्देशन हे ५०% आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर आणि बीपीएड किंवा बीएड ही पदवी असणे आवश्यक आहे. पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयात क्रीडा शिक्षक किंवा शारीरिक शिक्षण निर्देशक या पदावर ५ वर्ष अध्यापन केल्याचा अनुभव आवश्यक आहे.

तसेच पदोन्नती ही ५०% असणार आहे. यातील २५% कर्मचारी हे वर्ग ३ मधील आणि २५% कर्मचारी हे वर्ग ४ मधील असतील. त्यानुसार शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या आणि महापालिकेत ५ वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्याला यासाठी अर्ज करता येणार आहे.

त्यानुसार कर्मचाऱ्यांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदतदेण्यात आली आहे. आस्थापना विभागाकडे खातेप्रमुखांच्या शिफारशीसहित अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0