PMC Pension Software | सेवानिवृत सेवकांची पेन्शन प्रकरणे लवकर लागणार मार्गी! |  नवीन ऑनलाईन संगणक प्रणालीचे कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

Homeadministrative

PMC Pension Software | सेवानिवृत सेवकांची पेन्शन प्रकरणे लवकर लागणार मार्गी! |  नवीन ऑनलाईन संगणक प्रणालीचे कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

Ganesh Kumar Mule Sep 11, 2025 6:52 PM

Savarkar Gaurav Yatra | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न
Tender | PMC Commissioner | निविदा मंजुरीबाबत महापालिका आयुक्त खात्यांना लावणार शिस्त 
Mahatma Phule Jayanti | महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण | पुणे महापालिका या मिळकती तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत  प्रयत्नशील 

PMC Pension Software | सेवानिवृत सेवकांची पेन्शन प्रकरणे लवकर लागणार मार्गी |  नवीन ऑनलाईन संगणक प्रणालीचे कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

 

PMC Pension – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांची (PMC Retired Employees) पेन्शन  प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टीने नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पेन्शन प्रकरणे लवकर मार्गी लागणार आहेत. दरम्यान या प्रणाली बाबत संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उपायुक्त यांनी आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे महानगरपालिकेमध्ये सेवानिवृत होणाऱ्या सेवकांची पेन्शन प्रकरणे त्वरित होऊन, सेवकाला लवकरात लवकर वेळेत पेन्शन चालू होणे आवश्यक आहे. तसेच सेवापुस्तकात विविध नोंदी नसल्याने आणि विविध कारणास्तव पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहतात. पेन्शन  प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टीने नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणालीचे प्रशिक्षण  १५ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी. बी. हॉल, पुणे मनपा मुख्य भवन), येथे आयोजित केले आहे. पुणे महानगरपालिकेतील सर्व संबंधित ऑडीटर, पेन्शन बिल क्लार्क संपूर्ण पेन्शन विभाग यांनी नोट पेंड व पेन घेऊन सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा. या वेळेत प्रशिक्षण घेण्यास उपस्थित राहावे. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: