PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा
PMC Pedestrian Day | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) पादचारी दिवस (Pedestrian Day) हा अभिनव उपक्रम देशात राबवणारी पहिली महापालिका आहे. यंदा देखील पादचारी दिनाचे तिसरे वर्ष साजरा करण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)
पुण्यातील प्रतिष्ठित लक्ष्मी रस्ता या दिवशी वाहन विरहित करण्यात आला. नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक हा रस्ता वाहनांना बंद करून फक्तं पादचारी करण्यात आला. या शिवाय पुणे शहरातील १०० चौक देखील पादचारी सुरक्षा निश्चित करण्यात आले. आज पुणे महापालिकेच्या पथ विभागाने दर वर्षी प्रमाणे हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. पथ विभागाने केलेल्या योजना व मागील पाच वर्षात केलेली कामे यंदा प्रदर्शित करण्यात आली. पदपथ नियोजन करताना महत्त्वाचे मापदंड यावेळी प्रदर्शित करण्यात आले , परिसर संस्थेच्या मार्फत सार्वजनिक व शाश्वत वाहतुक याचे महत्व, सेव किड्स फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ते सुरक्षा कार्यशाळा , एकांश ट्रस्ट तर्फे विकलांग अपंग लोकांसाठी जनजागृती कार्यशाळा , साथी हाथ बढाना संस्थेचे मानसिक आरोग्य या विषयी पथनाट्य, sptm मार्फत झेब्रा वेषभूषा करून रस्ते सुरक्षा बाबत प्रबोधन असे उपक्रम होते.
त्र्यंबकेश्वर संस्थेतर्फे मर्दानी खेळ , रस्ता Jammers तर्फे संगीत इत्यादी मनोरंजन उपक्रम होते. आज महामेट्रोने ई-स्कुटी ही विद्युत वाहन मेट्रोपासून घरापर्यंत प्रवासासाठी उपलब्ध केले तसेच पीएमपीएमएल ने जादा बसचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा. श्री विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांच्या हस्ते झाले व पथ विभागाचे मा. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर अणि मा. अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, माजी मुख्य अभियंता (पथ विभाग) व्ही. जी. कुलकर्णी तसेच पर्यावरण विभागाचे प्रमुख मा.माधव जगताप उपस्थित होते. लक्ष्मी रस्ता व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष श्री फत्तेचंद रांका , पथारी संघटनेचे श्री. रवींद्र माळवदकर व श्री. शंके हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा सामान्य लोकांनी आनंद घेतला.