PMC Parking Policy | पुणे शहर ठेकेदारांच्या घशात ? | नवीन पार्किंग पॉलिसीच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

HomeBreaking News

PMC Parking Policy | पुणे शहर ठेकेदारांच्या घशात ? | नवीन पार्किंग पॉलिसीच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

Ganesh Kumar Mule Oct 04, 2024 8:37 PM

IGBC | PMC | हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध 
Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

PMC Parking Policy | पुणे शहर ठेकेदारांच्या घशात ? | नवीन पार्किंग पॉलिसीच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

 

Pune Parking Policy – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या पार्किंगच्या जागा ठेकेदारांच्या घशात घालून सर्वसामान्य नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणारे नवीन पार्किंग धोरण राबवण्याचा घाट महानगरपालिका प्रशासनाकडून घातला जात आहे. धोरण लागू झाल्यास आजपर्यंत जिथे सर्वसामान्य नागरिक मोफत वाहन पार्किंग करू शकत होते तिथेच वाहन पार्क करण्यासाठी यापुढे नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या ठेकेदारप्रेमी वृत्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात आले. (NCP – Sharadchandra Pawar Party)

याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महानगरपालिका प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. “पुणे महानगरपालिकेवर सध्या प्रशासक राज्य असून, लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना प्रशासकांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. मात्र, महायुती सरकारच्या काळात अधिकारी हेच शहरांचे राजे झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने पूर्वीच्या लोकनियुक्त सदस्यांनी आखलेले पार्किंग धोरण रद्द करून नवीन पार्किंग धोरण करण्याबाबत राज्य शासनासोबत पत्रव्यवहार केला. हा पत्रव्यवहार बेकायदेशीर असून तातडीने रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे. हे पार्किंग धोरण लागू झाल्यास पुणेकरांच्या खिशातून शेकडो कोटी रुपये ठेकेदारांच्या घशात जाणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार पक्षाचा या धोरणाला विरोध आहे” अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली.

प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना याबाबत निवेदन दिले असून, नवीन पार्किंग धोरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे. या आंदोलानाला श्री. प्रशांत जगताप , योगेश ससाणे, आशाताई साने, राहुल तुपेरे, स्वातीताई पोकळे, राजश्री पाटिल, दिलशाद आतार, यूसुफ़ शेख, दीपक कामठे, पूजा काटकर, गौरव जाधव, आप्पा जाधव , रोहन पायगुड़े, स्वप्निल जोशी, केतन ओरसे आदि पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0