PMC Online NOC | NOC साठी दिवसभरात २२०० हून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त | १५० हून अधिक प्रमाणपत्र तयार   | जैनुद्दीन हरून शैख यांना सर्वप्रथम ऑनलाईन NOC 

Homeadministrative

PMC Online NOC | NOC साठी दिवसभरात २२०० हून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त | १५० हून अधिक प्रमाणपत्र तयार  | जैनुद्दीन हरून शैख यांना सर्वप्रथम ऑनलाईन NOC 

Ganesh Kumar Mule Dec 22, 2025 8:38 PM

Agitation | pune congress | स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोठेही आणि कोणाचाही सहभाग नसल्यामुळे भाजप व संघाला काँग्रेसच्या देशभक्तांच्या नावाची ॲलर्जी | ॲड. अभय छाजेड
Arun Pawar | वृक्षमित्र, समाजसेवक अरुण पवार यांना कार्य-कर्तृत्व पुरस्कार प्रदान
Ramdas Athvale RPI | रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 12 जागा मिळाव्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी | मराठा – ओबीसी वाद न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे

PMC Online NOC | NOC साठी दिवसभरात २२०० हून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त | १५० हून अधिक प्रमाणपत्र तयार

| जैनुद्दीन हरून शैख यांना सर्वप्रथम ऑनलाईन NOC

 

PMC Election 2025-26 – (The Karbhari News Service) – आज दिवसभरात एकूण  २२०० हून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, ऑनलाईन प्रणालीद्वारे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत आहे. तर १५० हून अधिक प्रमाणपत्र तयार झाले आहेत. आज  जैनुद्दीन हरून शैख यांना सर्वप्रथम ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व खात्यांची पडताळणी करून एकत्रित ना हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रथमच ऑनलाईन यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. मागील निवडणूकी मध्ये भरपूर मनुष्यबळ लागत होते आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब होत होता यामुळे विहित कालमर्यादेत ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या करिता महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांसाठी खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली :

👉 https://nocelection.pmc.gov.in

या ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४४ खात्यांना जोडण्यात आले असून, उमेदवाराचा अर्ज एकावेळी सर्व खात्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी लिंक करण्यात आला आहे. तसेच उमेदवारास प्रमाणपत्र या संगणक प्रणालीमध्ये थेट डाउनलोड करून मिळाल्यामुळे, उमेदवारांचा वेळ वाचत आहे.

ही यंत्रणा नागरिकांना सोयीस्कर, पारदर्शक व कार्यक्षम सेवा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज प्रक्रियेत सुलभता मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: