PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

HomeBreaking Newsपुणे

PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

गणेश मुळे Mar 22, 2024 12:43 PM

Pune Municipal Corporation Holiday | मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी बाबत महापालिका आयुक्तांचे आदेश जारी! 
Dr Rajendra Bhosale IAS | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जाणार आरोग्य सेवकांची नेमणूक | पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आदेश
Palkahi Sohala 2024 | पालखी मार्गांवर वारकरी यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश | पालखी मार्गांची अधिकाऱ्या सोबत आयुक्तांची पाहणी 

PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

|खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड मधील नागरिकांची आयुक्तांशी बैठक

| युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन

 

PMC Monorail Project – (The Karbhari News Service) –  शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या थोरात उद्यान (Thorat Garden Pune) या ठिकाणी मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प (PMC Monorail Project) साकारत असून यामुळे सदर ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार असुन तसेच या उद्यान्यामधे यांत्रिकीकरण केले जाणार आहे. यामुळे उद्यान्यामधे मोकळा श्वास घेण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही, तसेच विकसित केलेले पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत. याचमुळे  प्रकल्पास नागरिकांतून विरोध होत असून कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि आदरणीय खा. वंदनाताई चव्हाण (MP Vandana Chavan) यांच्यावतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्तांची (Dr Rajendra Bhosale IAS)  भेट घेण्यात आली. युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुठा नदी काठ सुशोभीकरण कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. (Pune PMC News)

The Karbhari - Thorat Garden pune

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणारे थोरात उद्यान हे अत्यंत जुने आणि प्रशस्त अशा ठराविक उद्यानांपैकी एक ऑक्सिजन हब आहे. थोरात उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी पुणे मनपाच्या मोटर वाहन विभागातर्फे मोनोरेल साकारण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली जाणार असून या ठिकाणी बांधकाम केल्याने नागरिकांना मिळणारी मोकळी जागाही कमी होणार आहे. दोन बोगीच्या या मोनोरेलसाठी तब्बल ४०७ मीटरचा ट्रॅक बांधला जाणार असून नागरिकांतून याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे आपण नैसर्गिक अधिवास नष्ट करून सिमेंटचे नवे जंगल उभारत आहोत, याचा लवलेशही मनपाला नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

वाढते शहरीकरण आणि पुणे शहराचा गुदमरणारा श्वास तसेच प्रदूषण वाढत असताना निव्वळ मनोरंजनासाठी नागरिकांचा विरोध पत्करून नागरिकांसाठी केले जाणारे हे विकासकाम रोखण्यात यावे, अशी मागणी आज खा. वंदनाताई चव्हाण यांनी मनपाचे नवनियुक्त आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन नागरिकांचे म्हणणे पटवून दिले. मोनोरेल या गोंडस नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचे पापकर्म आपण करत असून नागरिकांची कोणतीही मागणी नसल्याने उलटपक्षी विरोध असल्याने सदर प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी विनंती कृती समितीच्या वतीने नागरिकांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम राबविण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

त्याचप्रमाणे खडकवासला धरण क्षेत्राच्या लगत वाढत असलेल्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात तेथील मैला पाणी खडकवासला धरणामध्ये मिसळत आहे. याबाबत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे ही बाब सुद्धा  आयुक्त  यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

या दोन्ही स्थितींमध्ये आपण विकास साधत असताना ज्या निसर्गात वास्तव्य करतो, त्या निसर्गाकडे सहजासहजी दुर्लक्ष करून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहोत, याची कल्पना आदरणीय आयुक्तांना देण्यात आली. भविष्यातही कोणताही उपक्रम हाती घेतल्यानंतर शाश्वत विकास साधला जावा आणि नागरिकांचे कायमस्वरूपी कल्याण चिंतून निर्णय प्रक्रिया पार पडावी, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या दोन्ही मुद्द्यांवर आदरणीय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम न राबविण्याचा तसेच पर्यावरणीय विचार करण्याचा शब्द दिला आहे.

या वेळी नितीन कदम ,श्वेता यादवाडकर, स्वप्नील दुधाने, किरण आढागळे, सुनील जानोरकर थोरात उद्यान वाचवा कृती समितीचे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.