PMC Medical College Dean | मेडिकल कॉलेजचे डीनना सेवेतून कमी करण्याचा निर्णय! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

HomeBreaking Newsपुणे

PMC Medical College Dean | मेडिकल कॉलेजचे डीनना सेवेतून कमी करण्याचा निर्णय! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

Ganesh Kumar Mule Sep 06, 2023 10:56 AM

SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याच्या प्रस्तावांना स्थगिती | महापालिका आयुक्तांचे SRA च्या CEO ना आदेश
PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार
PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करण्याचा मोह सुटेना | 5-6 वर्ष खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस

PMC Medical College Dean | मेडिकल कॉलेजचे डीनना सेवेतून कमी करण्याचा निर्णय! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

PMC Medical College Dean | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Medical College) प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला (Dean) रंगेहात पकडण्यात आले होते. याबाबत चौकशी करून आशिष बनगीरवार यांना महापालिका सेवेतून कमी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.

 पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Atal Bihari Vajpeyi Medical College) आशिष श्रीनाथ बनगिनवार, हे डीन (वर्ग-1) (Dean Ashish Bangirwar) म्हणून काम पाहत होते.

या प्रकरणी  एका 49 वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली होती, यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

महापालिका प्रशासनाकडून देखील बनगीरवार यांची सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यानुसार ते दोषी आढळल्याने महापालिका आयुक्तांनी त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाकडून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. कॉलेज च्या HOD कडे आता डीन चा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. लवकरच नवीन भरती प्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

——

News Title | PMC Medical College Dean | The decision to reduce the dean of the medical college from service! | Decision of Municipal Commissioner