PMC Marathi Bhasha Samiti | पुणे मनपा मराठी भाषा संवर्धन समिती कागदावरच | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन
PMC Marathi Bhasha Samiti | मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिकेने (PMC Marathi Bhasha Samiti) ज्या उद्देशाने स्थापन केली ती ध्येय धोरणे कागदावरच राहिलेली असून साहित्यिक उपक्रमला गती देऊ शकले नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Pune) वतीने मनसे नेते बाबू वागसकर (Babu Vagaskar) , शहराध्यक्ष साईनाथ बाबर (city president Sainath Babar), शहर सचिव रमेश जाधव, शहर सचिव रवी सहाणे यांच्या शिष्टमंडळाने नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना निवेदन दिले. यावेळी विक्रम कुमार यांनी मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासह तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविणार असल्याचे आश्वासन दिले. (PMC Marathi Bhasha Samiti)
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार,मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी मराठा भाषा संवर्धन समितीची स्थापना २०१२साली करण्यात आली. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) ज्या उद्देशाने स्थापन केली ती ध्येय धोरणे कागदावरच राहिलेली दिसतात .साहित्यिक उपक्रमला अद्याप गती देऊ शकले नाही. महापालिका प्रशासन व पदाधिकारी मराठी भाषेच्या संदर्भात उदासीन असल्याचे दिसते. मराठी भाषा संवर्धन समितीला सद्यस्थितीत पूर्ण वेळ कार्यालय नाही समितीसाठी कार्यालय व स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नेमावे. गेल्या दोन तीन वर्षांपासून राहिलेले समितीतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार द्यावे. साहित्यिक कट्टयावरील साहित्यिक कार्यक्रमात निमंत्रित पाहुण्यांनाफक्त ५००रुपये मानधन दिले जाते. मानधन २०००रुपये द्यावे.साहित्यिक कट्टयावरील समन्वयक कवी, लेखकांना समितीच्या बैठकिला निमंत्रित करावे.मराठीचा प्रचार प्रसार होण्यासाठी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संपर्कदूत म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, क्षेत्रिय कार्यालयांमध्ये एक अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार होते. हा उपक्रमाची अंबलबजावणी करावी, साहित्यिक उपक्रम आयोजन सातत्याने करावे आदि मागणीचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. (Maharashtra Navnirman Sena Pune)
News Title | PMC Marathi Bhasha Samiti | Pune Municipality Marathi Language Conservation Committee only on paper Statement to the Commissioner on behalf of Maharashtra Navnirman Sena