PMC Laigude Hospital Privatization | लायगुडे हॉस्पिटलच्या खासगीकरणाला शिवसेनेचा विरोध!
PMC Laigude Hospital Privatization – (The Karbhari news Service) – सिंहगड रोडवरील लायगुडे हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा घाट पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC)ने घातला आहे, असा आरोप शिवसेना खडकवासला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे हॉस्पिटल खासगी संस्थेला देण्याच्या प्रयत्नाचा शिवसेना खडकवासला पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल समोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला व भविष्यात असा प्रयत्न केल्यास नागरिकांचे सहभागाने तिव्र आंदोलन कारण्याचा इशारा देण्यात आला. (PMC Health Department)
२०१९ सालापासून काही लोक यासाठी प्रयत्न करीत आहेत. या भागातील सर्वसामान्य नागरिकांना एकमेव या हॉस्पिटलचा आधार आहे. सर्वसामान्य लोकांना याठिकाणी मोफत उपचार मिळत आहेत. नवीन समाविष्ट गावातील खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड व धायरी या भागातील लोक उपचारासाठी या ठिकाणी येत असतात. कोविड काळात अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले व कोविड सेंटर देखील सुरु होते. त्याचा अनेक नागरिकांना उपयोग झाला.
दोन वर्षापासून येथील ऑपरेशन थेटर साठी आलेली मशीनरी पडून आहे. ती उभारण्यात आलेली नाही. चांगल्या सुस्थितील साहित्य भंगारात काढण्यात येत आहे असा आरोप करण्यात आला.
या प्रसंगी उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले, नितीन वाघ, महेश पोकळे, महेश मते, बुवा खाटपे, तानाजी पवळे, सचिन पासलकर, मनीष जगदाळे,संतोष शेलार, राजू चव्हाण, अरुण घोगरे, अविनाश सरोदे,महेश विटे, विनायक नलावडे,नाना मरगळे, राज पायगुडे, शिवाभाऊ पासलकर, विजय कोल्हे, गोकुळ करंजावणे, तानाजी गाढवे, अमोल दांगट, केतन शिंदे, अमोल मराठे, अनिकेत देशमुख, गुरुदत्त हगवणे, कल्पेश वाजे, राजाभाऊ पोळेकर, मोहन गायकवाड,भाई ताम्हणकर, गौरव करंजावणे हे उपस्थित होते.