PMC Labour Welfare Fund | कामगार कल्याण निधीचे सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन 

Homeadministrative

PMC Labour Welfare Fund | कामगार कल्याण निधीचे सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन 

Ganesh Kumar Mule Aug 02, 2025 8:07 PM

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | बहिस्थ पद्धतीने पदवी/पदविका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून रहावे लागणार वंचित!
Pune PMC News | मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक | राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा
Safai Karmchari | सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा – शेरसिंग डागोर

PMC Labour Welfare Fund | कामगार कल्याण निधीचे सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कायम आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील जे अधिकारी / सेवक कामगार कल्याण निधीचे सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपले अर्ज माहितीसह (नाव, हुद्दा, खाते, भ्रमणध्वनी क्र., शैक्षणिक आर्हता, केलेले कार्य इ.) खातेप्रमुखांचे शिफारशीने १२ ऑगस्ट  अखेर कामगार कल्याण विभागाकडे सादर करावेत. असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी केले आहे. (M J Pradip Chandren IAS)

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / सेवकांसाठी सन २००५-०६ पासून कामगार कल्याण निधीची स्थापन करण्यात आली आहे. कामगार कल्याण निधी नियम २००५ ( नियम बदल सन २०१६- २०१७) मधील नियम ५ (१) नुसार महापालिका आयुक्त यांनी निधीच्या अंमलबजावणीसाठी व नियमातील विहित कार्ये पार पाडण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना करावयाची आहे.

नियम ५ (२) नुसार कार्यकारी समितीमध्ये खालील सदस्य असतील. सदर समिती सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षासाठी असणार आहे.

१. सभासद – आयुक्त यांनी नियुक्त केलेला १ अधिकारी वर्ग १ मधून

२. सभासद – आयुक्त यांनी नियुक्त केलेला १ अधिकारी वर्ग २ मधून ३. सभासद – आयुक्त यांनी नियुक्त केलेले २ कर्मचारी वर्ग ३ मधून
४. सभासद – आयुक्त यांनी नियुक्त केलेले ३ कर्मचारी वर्ग ४ मधून