PMC Labour Welfare Department | कंत्राटी कामगारांना ई -पहचान पत्र देण्याबाबत विविध विभागांची उदासीनता!
| मुख्य कामगार अधिकारी यांनी दिला इशारा
ESI Card – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत बाह्यस्त्रोताद्वारे सेवा घेण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा योजनेचे ई-पहचान पत्र (E.S.I Card) वितरीत करण्याबाबत विविध विभागांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र काही विभाग याबाबत अहवाल देण्याबाबत उदासीन आहेत. यावर मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी याबाबत अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
कंत्राटी कामगारांना त्यांचे कुटुंबाचे तपशिलासह ई -पहचान पत्र वितरीत करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी निर्देश जारी केले होते. त्यानुसार विविध विभागात बाह्यस्त्रोताद्वारे घेतलेल्या कंत्राटी कामगारांना त्यांचे कुटुंबाचे तपशिलासह ई-पहचान पत्र वितरीत करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी कार्यपद्धती विहीत करून दिलेल्या कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करून त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तथापी अद्यापही काही विभागांकडून अनुपालन अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संदर्भातला अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांना सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (ज) यांचे पत्रात दिलेल्या निर्देशानुसार विहीत केलेल्या नमुन्यात विषयांकित कामाचा अहवाल तात्काळ कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. अन्यथा याची तक्रार अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे करण्यात येईल. असा इशारा केंजळे यांनी दिला आहे.

COMMENTS