PMC Labour Welfare Department | कोविड कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान वितरित

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | कोविड कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान वितरित

Ganesh Kumar Mule Mar 24, 2026 8:38 AM

PMPML Reward Scheme | पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर 
Arvind Shinde | अतिरिक्त आयुक्ताची भूमिका वादग्रस्त असल्याने त्यांना शासन सेवेत परत पाठवा | कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मागणी
BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे

PMC Labour Welfare Department | कोविड कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान वितरित

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ महामारीच्या काळात कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन दिवंगत झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये २५ लाखांचे आर्थिक अनुदान  महापौर मंजुपा दीपक नागपुरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. (PMC Contract Employees)

कोविड-१९ महामारीच्या अभूतपूर्व संकटाच्या काळात महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत होते. या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने “कोविड-१९ प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच” ही योजना कार्यान्वित केली होती. या योजनेअंतर्गत यापूर्वी ८८ कायम कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५० लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.

याच योजनेअंतर्गत कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन दिवंगत झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये २५ लाखांचे अनुदान देण्यास मा. मुख्य सभेने मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे यांनी दिली.

महापौरांनी आपल्या मनोगतात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला अभिवादन केले. कोविडच्या संकटकाळात महानगरपालिकेचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिले. त्यांच्या त्यागामुळे शहरातील आरोग्य व अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी सभागृह नेते  गणेश बिडकर यांनी अशा कठीण प्रसंगी मुख्य सभेने त्वरित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच कामगार कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कामगारांना अनुदान मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यामध्ये मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी बुगप्पा कोळी तसेच  प्रशांत चव्हाण, . सुहास शेवते व  मनिषा कायटे यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांपैकी  प्रियंका जाधव व चारुशीला सोनवणे यांनी आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही मदत त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास  महापौर मंजुपा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर,  सभागृह नेते  गणेश बिडकर,  स्थायी समिती सदस्य  प्रशांत जगताप, सभासद  सचिन दोडके, मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व कामगार कल्याण विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: