PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचारी विजय गेजगे यांच्या वारसाला २५ लाख | मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची माहिती

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचारी विजय गेजगे यांच्या वारसाला २५ लाख | मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Dec 16, 2025 4:07 PM

Securtiy Guard | PMC | पुणे महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर | सुनील शिंदे
Mukhymantri Yojanadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
Kasba by-election | कसब्याच्या पराभवाचे मूल्यमापन; योग्य ती कारवाई करू | देवेंद्र फडणवीस

PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचारी विजय गेजगे यांच्या वारसाला २५ लाख | मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची माहिती

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडील कचरा मोटार बिगारी सेवक कै. विजय गोपाळ गेजगे यांचा ५ March २०२५ रोजी अपघाती मृत्यू झाला होता.

संबंधित  सेवकाच्या वारस पत्नी श्रीमती दिपाली विजय गेजगे यांना मंगळवार रोजी रक्कम रुपये २५ लाखाचा धनादेश श्रीमती पवनीत कौर (अतिरिक्त महापालिका आयुक्त – जनरल) यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे खाते प्रमुख  नितीन केंजळे (मुख्य कामगार अधिकारी) व कर्मचारी  मंगेश जाधव (लिपिक टंकलेखक) हे उपस्थित होते. (PMC Accident Insurance)

पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना  महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर सन २०१६ पासून पुणे महानगरपालिकेत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत कामगार कल्याण विभागामार्फत आज अखेर २४ सेवकांच्या वारसांना  २,४९,६०,०००/- रक्कम अदा करण्यात आले आहेत.

याबाबत संबंधीत सेवकाच्या वारसांनी या आर्थिक मदतीबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: