PMC Kothrud Bavdhan Ward Office | कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन!

HomeBreaking Newsपुणे

PMC Kothrud Bavdhan Ward Office | कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन!

गणेश मुळे Jun 05, 2024 4:19 PM

PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!
Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेचा नगरविकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार!
Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिका तिसऱ्या स्थानावर 

PMC Kothrud Bavdhan Ward Office | कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन!

 

World Environment Day 2024 – (The karbhari News Service) – कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय व क्षेत्रिय आयुर्वेदीक अनुसंधान संस्था यांच्या वतीने “जागतिक पर्यावरण दिन” निमित्त २०० वृक्षाचे रोपण व जनजागृती प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.  (Pune Municipal Corporation (PMC)

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था तसेच जनवानी सहकारी संस्थान कमिन्स इंडिया लिमिटेड,स्वच्छ सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून ” जागतिक पर्यावरण दिन” व “स्वच्छ भारत अभियान मिशन २०२४” या निमित्ताने प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तिन्ही प्रभागात विशेषतः श्रमिक वसाहत, मोरे विद्यालय, राऊतवाडी, केळेवाडी, हनुमान नगर, राजीव गांधी नगर,किष्किंधा नगर, लक्ष्मीनगर या परिसरारात झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. तसेच नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पर्यावरण पुरक प्रचार फेरी काढण्यात आली. सदर प्रभातफेरी मध्ये स्थानिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.

विशेषतः झोपडपट्टीच्या गल्लोगल्ली ओला व सुका कचरा वेगळा करा, नदी नाल्यामध्ये कचरा टाकू नका, ए आर ए आय टेकडीवरती कचरा टाकून पर्यावरण दूषित करू नका, रिकाम्या जागेत कचरा टाकू नका, ड्रेनेज लाईन मध्ये घाण करू नका, प्लॅस्टिकचा वापर टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एक तरी झाड लावा व त्याचे व्यवस्थित संगोपन करा जेणेकरून आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल असे वातावरण तयार करा, आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा व आपल्या आरोग्याचे रक्षण करा, जर कचऱ्याचे विभाजन केले नाही किंवा कचरा इतरत्र टाकून आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण केली तर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही संबंधित नागरिकांना देण्यात आल्या. श्रमिक वसाहती जवळ २० वर्षापासून क्रॉनिक स्पॉटवर कचरा पडत होता त्याठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन तो बंद करण्यात आला. त्याठिकाणी सफाई करू रोज सडा रांगोळी काढली जाते. तसेच क्षेत्रिय आयुर्वेदीक अनुसंधान संस्थानच्या सहकार्याने कमिन्स कंपनीच्या मागील परिसरात अग्नीमंथा,सीता अशोक, अशोक, सुपारी, शतावरी, अर्जून, गंबारी, निरगुंडी, कन्हेरी, मेंहदी, बिबला, शौनक, आवळा, करंज, जांभूळ ईत्यादी वनस्पतीचे २०० झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात आला. सदर वृक्षारोपन कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त, संदीप कदम गणेश सोनुणे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला. वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, रूपाली शेंडगे, सुरज पवार, गणेश चोंधे, जया सांगळे मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे तसेच अनुसंधान प्रभारी डॉ. अरूण गुरव, संस्थानचे अधिकारी डॉ. मनिष वंजारी, डॉ. पल्लवी जमदग्नी, डॉ. श्रीरंग जमदग्नी, डॉ. रशिका कोल्हे, डॉ. गजानन पवार व इतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. सदर पर्यावरण पुरक रॅलीचे आयोजन जनवाणीच्या जयश्री पाटील, समिर आजगेकर, विवेक जाधव, अतिश भाडळे, शेखर काकडे, हेमंतकुमार नाईक, मंगेश क्षीरसागर, कोमल दहिभाते, करूना सोनवणे, हनुमंत जाधव, सुप्रिया वाघमारे, मोहिनी गायकवाड व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.