PMC Kamgar Union | कंत्राटी सफाई कामगारांना कायम केलेच पाहिजे | पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) तर्फे मनपा भवन येथे आक्रोश निदर्शन

Homeadministrative

PMC Kamgar Union | कंत्राटी सफाई कामगारांना कायम केलेच पाहिजे | पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) तर्फे मनपा भवन येथे आक्रोश निदर्शन

Ganesh Kumar Mule Aug 20, 2025 7:53 PM

MPSC Student | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप
Mahaarogya camp | पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
Conference on ‘Urban Infrastructure’ | जी-20 निमित्त पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद

PMC Kamgar Union | कंत्राटी सफाई कामगारांना कायम केलेच पाहिजे | पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) तर्फे मनपा भवन येथे आक्रोश निदर्शन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – “कंत्राटी सफाई कामगारांना कायम केलेच पाहिजे” या प्रमुख मागणीसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) तर्फे आज मनपा भवन येथे भव्य आक्रोश निदर्शन आयोजित करण्यात आले. (PMC Safai Kamgar)

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याची समान संधी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तरीदेखील कंत्राटी कामगारांना हा अधिकार नाकारला जात आहे. मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार आणि नागपूर महानगरपालिकेतील ४५०० कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, ही निदर्शनातील ठाम मागणी होती.

या प्रसंगी युनियनचे अध्यक्ष कॉ.उदय भट, जनरल सेक्रेटरी कॉ.मुक्ता मनोहर, यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे आणि सर्वश्रमिक महिला मोर्चाच्या कॉ.मेधाताई थत्ते यांनी लढ्याला सक्रिय पाठींबा दर्शविला. तसेच कार्याध्यक्ष कॉ.मधुकर नरसिंगे, जॉईंट सेक्रेटरी कॉ.वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष कॉ.दिलीप कांबळे, कॉ.करूणा गजधनी, कॉ.शोभा बनसोडे, कार्यालयीन चिटणीस कॉ.राम अडागळे, विभागीय अध्यक्ष कॉ.देवनाथ सद्भभैया, कॉ.तानाजी रिकिबे, सचिव कॉ.ओंकार काळे, कॉ.संजय रासगे, कॉ.सुनिल कांबळे, कॉ.आण्णा ढावरे व कॉ.अशोक कांबळे, पूर्ण वेळ कार्यकर्ते कॉ.सिध्दार्थ प्रभुणे, कॉ.प्रदीप येसंबरे आणि मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: