PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन” आमची सहयोगी संघटना नाही | कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे महापालिका आयुक्तांना पत्र
PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | पुणे महानगरपालिका कामगार युनियन (Pune Mahanagarpalika Kamgar Union) (मान्यताप्राप्त) संघटनेची “पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन” (कारकून विभाग), (PMC Employees Union) या सहयोगी संघटना नाही. असे पत्र कामगार युनियन (मान्यताप्राप्त) कडून महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) देण्यात आले आहे. पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यपद्धतीत बदल होईपर्यंत आम्ही त्यांना सहयोगी मानणार नाही, असे पत्राद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका कामगार युनियन ही गेल्या 81 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत
कार्यरत असून पुणे महानगरपालिकेमध्ये एकमेव MRTU ACT अंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे. एवढ्या प्रदीर्घ कार्यकाळात सर्व सेवकांचे प्रश्न सोडवताना औद्योगिक शांततेचा भंग होणार नाही याची जाणीव ठेवून पुणे महानगरपालिका कामगार युनियन ने कामकाज चालवले आहे. हे कामकाज करत असताना अधिकारी, अभियंता, डॉक्टर असोसिएशन हे विभाग पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे सहयोगी राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे कारकून विभागातील काही विशिष्ट प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन याची स्थापना पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली व एक सहयोगी संघटना म्हणून ते आज पर्यंत कार्यरत होते. (PMC Pune)

पत्रात पुढे म्हटले आहे कि, परंतु अलीकडील काळात पी.एम.सी एम्प्लॉईज युनियन मध्ये पदाधिकारी बदल झाला आहे व हा बदल झाल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आमच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आम्ही सुचित करतो की पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यपद्धतीत बदल होईपर्यंत व त्याबाबत आम्ही लेखी पत्र देऊन अवगत करेपर्यंत आम्ही पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन बरोबरचे आपले सहयोगी संघटना म्हणून संबंध स्थगित केले आहेत. असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
————-
News Title | PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “PMC Employees Union” is not our Affiliate Union Letter from Labor Union (Recognised) to Municipal Commissioner