PMC Kamgar Dindi | पुणे महानगरपालिकेच्या कामगार दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश!

Homeadministrative

PMC Kamgar Dindi | पुणे महानगरपालिकेच्या कामगार दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश!

Ganesh Kumar Mule Jun 21, 2025 2:34 PM

Pune Municipal Corporation (PMC) | तुम्ही सेवानिवृत्त नाही तर तुमची दुसरी आवृत्ती सुरु होत आहे – डॉ दिनेश ललवाणी | महापालिकेचे 43 कर्मचारी सेवानिवृत्त
Pune PMC News | आपले विचार हीच आपली शक्ती : डॉ राजेंद्र भारूड | महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान!
Pune PMC News | पुणे महापालिकेत साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

PMC Kamgar Dindi | पुणे महानगरपालिकेच्या कामगार दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश!

 

Pune Palkhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत (PMC Labour Welfare Department) दरवर्षीप्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी- पुणे कामगार दिंडीचे आयोजन करण्यात आले. कामगार दिंडीमध्ये जवळपास 500 अधिकारी/ कर्मचारी सहभागी झाले होते. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (Nitin Kenjale PMC)

कामगार दिंडीचे स्वागत कळस येथे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. (Prithviraj B P IAS) यांनी नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी तथा दिंडीप्रमुख याना श्रीफळ व पुष्प देऊन केले. कामगार दिंडीचे स्वागत करताना पृथ्वीराज यांनी वीणा परिधान केली. तसेच श्री. केंजळे यांनी त्यांचा गांधी टोपी, उपरणे व श्रीफळ देऊन सन्मान केला. पृथ्वीराज यांनी कामगार दिंडीमधील कर्मचारी यांच्यासमवेत फुगडी खेळली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कामगार दिंडीमध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे विविध समाज सुधारक घोषणांचा प्रचार करण्यात आला. कामगार दिंडीचे नियोजन कामगार कल्याण विभागातील कर्मचारी सुहास शेवते व  मनीषा कायटे यांनी केले.

कामगार दिंडीसाठी सुरक्षा विभाग, मोटार वाहन विभाग, पीएमसी अर्बन बँक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, पुणे मनपातील आजी माजी कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कामगार दिंडीचे नेतृत्व श्री.नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी तथा दिंडीप्रमुख यांनी केले.