PMC Junior Engineer Recruitment 2025 | भरतीच्या नवीन जाहिरातीसाठी अजून काही काळ करावी लागणार प्रतीक्षा!
| सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीसाठी १२ सप्टेंबर पर्यंत वाढवली मुदत
PMC Junior Engineer Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरणेसाठी नवीन जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र आता अजून परीक्षा करावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. कारण सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीसाठी १२ सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे १५ सप्टेंबर पर्यंत जाहिरात येईल, असे सांगितले जात आहे.
एकूण १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण होत आली आहे. दरम्यान सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४ हजार १६७ उमेदवारांनी लाभ घेतला आहे. मात्र प्रशासनाला अपेक्षित होते कि एकूण १६ हजार ६२७ पैकी किमान ५ हजार उमेदवार याचा लाभ घेतील. मात्र कमी उमेदवार आल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे.
दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कारण या सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
त्यानुसार सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४१६७ उमेदवारांनी लॉग इन करून लाभ घेतला आहे. ही मुदत ३० ऑगस्ट पर्यंत होती. मात्र आता ही मुदत वाढवून १२ सप्टेंबर करण्यात आली आहे. तोपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सुधारित करण्यासाठी या लिंकवर https://www.pmc.gov.in/b/recruitment Online पद्धतीने अर्ज करावा. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी केले आहे.

COMMENTS