PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा 25 जानेवारी ला | महापालिका प्रशासनाकडून घोषणा
PMC Junior Recruitment Bharti Exam – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. यासाठी १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याची तारीख प्रशासना कडून निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील एकूण १८ शहरात ही परीक्षा होणार होती. पश्चिम महाराष्ट्र सहित मराठवाडा मधील विविध शहरांचा समावेश होता. मात्र अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रा बाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान प्रशासना कडून सांगण्यात आले होते कि, अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत. यासाठी १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा २५ जानेवारी ला होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र सोबत असणे आवश्यक आहे. तर परीक्षा केंद्र आणि परीक्षा वेळ नंतर कळविण्यात येईल. असे प्रशासनाने म्हटले आहे. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2026)
दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरु केली होती. १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे.

Screenshot

COMMENTS