PMC JE Recruitment 2025 | अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी १ डिसेंबर ला परीक्षा | उपायुक्त विजयकुमार थोरात यांची माहिती

Homeadministrative

PMC JE Recruitment 2025 | अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी १ डिसेंबर ला परीक्षा | उपायुक्त विजयकुमार थोरात यांची माहिती

Ganesh Kumar Mule Nov 17, 2025 9:34 PM

MWRRA | Pune Municipal Corporation | वाढीव पाण्याच्या तक्रारीबाबत MWRRA चा पुणे महापालिकेला दिलासा  | आता सुनावणी देखील घेण्याची गरज नाही 
Affidavit | Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती
Pune News | कै. डॉ. विकास आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

PMC JE Recruitment 2025 | अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी १ डिसेंबर ला परीक्षा | उपायुक्त विजयकुमार थोरात यांची माहिती

 

PMC Junior Recruitment Bharti Exam – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.  आता १ डिसेंबर ला परीक्षा होणार आहे. राज्यातील एकूण १८  शहरात ही परीक्षा होणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली. दरम्यान उमेदवारांना ८ दिवस अगोदर हॉल तिकीट दिले जाणार आहेत, असे देखील उपायुक्त थोरात यांनी सांगितले. (Vijaykumar Thorat PMC)

 

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत. यासाठी आता १ डिसेंबर ला परीक्षा होणार आहे. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2025)

दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती  प्रक्रिया सुरु केली होती. १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे.

 

दरम्यान आता अर्ज आल्यानंतर या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. महापालिका प्रशासनाकडून हे काम IBPS या संस्थेला दिले आहे. त्यानुसार संस्थेकडून तयारी पूर्ण होत आली आहे. पुणे शहर शिवाय मुंबई सह १८ शहरात या परीक्षेचे केंद्र असणार आहेत. या बाबत संस्था आणि महापलिका यांच्यात चर्चा सुरु आहे. त्यानुसार लवकरच परीक्षा केंद्र जाहीर केले जाणार आहेत. तर उमेदवारांना परीक्षेच्या ०८ दिवस अगोदर हॉल तिकीट दिले जाणार आहेत. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: