PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली! 

HomeBreaking Newsपुणे

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली! 

कारभारी वृत्तसेवा Jan 08, 2024 3:55 PM

Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा
PMC JE Recruitment 2024 | Opportunity to become Junior Engineer (JE Civil) in Pune Municipal Corporation

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली!

| महापालिकेकडून 113 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

PMC Junior Engineer Recruitment | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया सुरु केली आहे. आता 113 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. 113 पैकी 13 पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. तर 100 ही सर्व संवर्गासाठी असतील. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. सोबतच आता महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाईट वर 16 जानेवारी पासून उपलब्ध होतील. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. दरम्यान JE  साठी 3 वर्ष अनुभवाची (Experience Condition) अट कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना चांगलीच संधी मिळणार आहे.  (Pune Mahanagarpalika Bharti 2024)

जाहिरातीत काय म्हटले आहे? 

 
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग – ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्र.१/१५७९ दिनांक ०९/०१/२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या  जाहिरातीमधील पद अभियांत्रिकी सेवेमधील आहे. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा व पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या
https://pmc.gov.in/mr/recruitments 
या लिंकवर दिनांक १६/०१/२०२४ पासून उपलब्ध असतील.

– JE ची अनुभवाची अट कमी झाल्याने नवीन उमेदवारांना संधी

दरम्यान कनिष्ठ अभियंता (JE) साठी 3 वर्षाची अनुभवाची अट ठेवण्यात आली होती. मात्र याबाबत बऱ्याच दिवसापासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा  प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजूरी दिली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली आहे. याचा नुकतीच पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना फायदा होणार आहे.
The karbhari - PMC Advt