PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!

HomeBreaking Newsपुणे

PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!

Ganesh Kumar Mule Jul 01, 2023 12:31 PM

Nodal Officer | सचिवालय कक्षात महापालिकेचा समन्वय अधिकारी | नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष
IT nodal officers : आता महापालिकेच्या प्रत्येक विभागात दोन आयटी नोडल ऑफिसर! 
Biometric Attendance | बायोमेट्रिक हजेरीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती बंधनकारक | नोडल ऑफिसरसाठी मंगळवारी कार्यशाळा | उपस्थित राहणे अनिवार्य

PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!

| अधिकारी नियुक्त करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

PMC IT Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रत्येक विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी 2 समन्वय अधिकारी (Nodal Officer) नियुक्त करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी प्रत्येक विभागाला दिले आहेत. त्याची जबाबदारी खाते प्रमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आयटी कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (PMC IT Department)

पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर (PMC Pune Website) प्रत्येक  विभागाची माहिती अद्यावत करणे, (उदा. माहिती अधिकार कलम ४ कलम ६०अ, नागरीकांची सनद, विभाग संपर्क माहिती इ.), तक्रार निवारण प्रणालीवरील( आपले सरकार, पी.जी पोर्टल, PMC Care ) तक्रारीचे समन्वय साधणे व निरस्त करणे व प्रणालीविषयी तांत्रिक अडचणी आल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधणे. दरमहा सर्व मासिक अवहालSpreadsheet मध्ये भरणे व इतर सर्व संगणक विषयक कामांसाठी समन्वयक साधण्याची जबाबदारी. विभागातील आय टी नोडल ऑफिसर यांच्यावर निश्चित करण्याचे आदेशात म्हटले आहे. (PMC Pune News)

सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरिता  विभागाची संपूर्ण माहिती असलेल्या व संगणकाचे ज्ञान असलेल्या दोन सेवकांची आयटी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करून त्याची माहिती  ०३/०७/२०२३ सं ०५:०० वाजेपर्यंत सादर करावी.
तसेच खात्याकडील आयटी नोडल ऑफिसर यांची बदली /बढती झाल्यास त्याजागी नवीन आयटी नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करून त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागास व माहिती व तंत्रज्ञान विभागास अवगत करावे. असे देखील आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)

—-
News Title | PMC IT Department |  Now two nodal officers for IT related work in each department of Pune Municipal Corporation!