PMC Helath Department | महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू | शासन निर्णय नुसार अमल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करणेत आला आहे. सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यावर अमल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वर्ग-४ मधील किटक प्रतिबंध विभाग व नागरी हिवताप विभागाकडील फिल्डवर्कर व सायनोगेसिंग बिगारी (डीस इन्फेक्शन बिगारी + बिगारी निर्जंतुकीकरण) या पदाचे कामाचे स्वरूप पाहता सदर सेवकांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू करण्याबाबत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी शासनास प्रस्ताव पाठवला होता. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सदर कर्मचान्यांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय लागू करण्यात आला आहे.
आयुक्त, पुणे महानगरपालिकेच्या यांच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील किटक प्रतिबंध विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग ४ मधील फिल्डवर्कर व सायनोगेसिंग बिंगारी (डीस इन्फेक्शन बिगारी + बिगारी निर्जंतुकीकरण) सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर कर्मचान्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील २४.०२.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महानगरपालिका स्तरावर नियमोचित कार्यवाही करावी. असे निर्णयात म्हटले आहे.
| मनपा प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात बैठक
दरम्यान सरकारच्या या निर्णयावर अमल करण्याबाबत पुणे महापालिका कामगार संघटना यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या सोबत संघटनेची बैठक झाली. याबाबत संघटनेचे सरचिटणीस एस के पळसे यांनी सांगितले कि, महापालिका आयुक्त यांनी प्रशासनाला या निर्णयावर तत्काळ अंमल करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच याबाबत सर्कुलर जारी केले जाणार आहे.
आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना घाणीत काम करावे लागते. त्यामुळे या सेवकांना देखील घाणभत्ता लागू करण्याची आम्ही मागणी करत होतो. २०१७ सालापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. अखेर सरकारने याची दखल घेतली आहे. त्यामुळे या सेवकाना आणि त्यांच्या वारसांना दिलासा मिळाला आहे.
- एस के पळसे, सरचिटणीस, पुणे महापालिका कामगार संघटना

COMMENTS