PMC Health Department | स्व.राजीव गांधी रुग्णालय येथे तज्ज्ञ सेवेचे उद्घाटन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि डॉ.D.Y. पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्व.राजीव गांधी रुग्णालय येथे आज मेडिसिन/ अस्थिरोग/ नेत्र रोग/बालरोग/ स्त्री रोग/ इत्यादी तज्ज्ञ सेवेचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Dr Nina Borade PMC)
उद्घाटन प्रसंगी डॉ. D.Y.पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चव्हाण, डॉ मनोज बागडे, In-Charge वैद्यकीय अधिकारी, भा.स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, प्रशासन अधिकारी शालिनी पवार इतर विभाग प्रमुख तसेच पुणे महापालिकेचे परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा गलांडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ माया लोहारे, वैद्यकीय अधिकारी मेडिकल डॉ.सुनील आंधळे , डॉ.गुणेश बागडे आणि रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स/ कर्मचारी उपस्थित होते.
भा.स्व. राजीव गांधी रुग्णालयाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे, D.Y. मेडिकल कॉलेजचे सर्व अधिकारी तसेच महापालिकेच्या सर्व अधिकार्यांचे स्वागत करून केलेल्या मार्गदर्शना बाबत आभार व्यक्त करण्यात आले.
COMMENTS