PMC Health Department | पदोन्नती प्रक्रियेत CPS ची DPH पदविका ग्राह्य धरण्यात यावी | सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतील उप आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत “College of Physicians and Surgeons (CPS), मुंबई येथून प्राप्त झालेली Diploma in Public Health (DPH) ही पदविका ग्राह्य धरण्यात यावी. अशी मागणी आरोग्य विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी महापालिका आयुक्त केली आहे. कारण याबाबत आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, CPS मुंबई येथून प्राप्त झालेली DPH पदविका आम्ही २०१८ पूर्वी अधिकृतरीत्या घेतलेली असून, त्यावेळी ही पदविका महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (MMC) मान्यताप्राप्त होती. महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकी निर्णयांनुसार वैध मानली जात होती, आणि राज्य शासनाच्या व महापालिकेच्या भरती/पदोन्नती प्रक्रियेत वापरण्या आली होती. त्यामुळे DPH पदविका वैध आहे. या अधिकाऱ्यांनी पुढे असे म्हटले आहे कि, त्यामुळे अशा वैध पदविकेवर आज आक्षेप घेणे म्हणजे पूर्वलक्ष्यी पदविका उत्तीर्ण झालेले व अनेक वर्षे महानगरपालिकेमध्ये सेवा देत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्यायकारक होणार आहे. दरम्यान उप आरोग्य पदासाठीची बढती समितीची बैठक दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या बैठकीत महापालिका प्रशासन काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Pune Municipal Corporation Health Department)
| उप आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नती वरून वाद
आरोग्य विभागातील उप आरोग्य अधिकारी पदासाठी पदोन्नती देण्यात येणार आहे. महापालिका नियमावली आणि सेवाज्येष्ठते नुसार यासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक आणि डॉ वैशाली जाधव पात्र होत आहेत. त्यानुसार बढती समितीत निवड यादी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. आरोग्य विभागांतील उप आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत “College of Physicians and Surgeons (CPS), मुंबई येथून प्राप्त झालेली Diploma in Public Health (DPH) ही पदविका ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी तक्रार आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन आणि आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांकडे हीच पदविका आहे. मात्र हा आक्षेप चुकीचा असल्याचा दावा सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
उप आरोग्य अधिकारी पदासाठी नेमणुकीची अर्हता आणि पद्धत काय आहे?
महापालिका सेवा नियमावली नुसार महापालिका उप आरोग्य अधिकारी पद हे नामनिर्देशन आणि १००% पदोन्नती ने भरले जाते. त्यासाठीची शैक्षणिक अर्हता आणि पद्धत ही अशी आहे
उप आरोग्य अधिकारी तथा उप आरोग्य प्रमुख उप आरोग्य प्रमुख (कुटुंब कल्याण)
नामनिर्देशन – अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्य शास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी (M.D.(P.S.M.)] परीक्षा उत्तीर्ण.
ब) राज्य शासन / केंद्रशासन / स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी / प्रभाग वैद्यकीय अधिकारी वा तत्सम पदावरील किमान ५ वर्षांचा पर्यवेक्षीय व कार्यकारी पदाचा अनुभव आवश्यक.
क) रुग्णालयातील प्रशासन, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथ आजार निर्मुलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी बाबींच्या कार्याचा किमान ०५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.
पदोन्नती – १००% नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गातील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

| CPS DPH पदविका वैध असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा
महापालिका आयुक्त यांना लिहिलेल्या पत्रात सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी म्हटले आहे कि, CPS पदविका असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना याआधी पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि पदावर कार्यरत आहेत. त्याच प्रमाणपत्रावर आज आक्षेप घेणे म्हणजे विषम वागणूक आणि न्याय्य अपेक्षेचा भंग आहे. यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत असमाधान आणि मानसिक तणाव निर्माण होत आहे. पत्रात पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेच्या विधी विभागाने CPS पदविकांची वैधता मान्य केली आहे. या अनुषंगाने CPS DPH धारक अधिकाऱ्यांना पदोन्नतीस पात्र सल्ला विधी विभागाने दिला आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने देखील सामान्य प्रशासन विभागस CPS DPH पदविका वैध असल्याचे कळविले आहे. सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि, आम्ही अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्यरत असून, सार्वजनिक आरोग्य विषयक योजना, साथ रोग नियंत्रण, आरोग्य मोहिमा इ. मध्ये आमचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. अशा अनुभवी अधिकाऱ्यांना केवळ पदविकेवर आक्षेप घेऊन रोखणे अन्यायकारक ठरेल. ३४ नवीन गावांचा समावेश झाल्याने लोकसंख्या वाढ झालेली आहे, त्यामुळे आरोग्य विषयक कामकाजाची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे.
| सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी या केल्या आहेत मागण्या
१. CPS मुंबई येथून २०१८ पूर्वी प्राप्त DPH पदविकेवरून पदोन्नतीस घेतलेला आक्षेप पूर्णतः निराधार, अवैध पूर्वग्रहदूषित असल्याने आक्षेप निरस्त करावा.
२. अशा पदविका धारक अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी पात्रता अधिकृतरित्या मान्य करावी.
३. CPS पदविकेवर आधीच पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांच्या धर्तीवर सर्व CPS DPH धारक अधिकाऱ्यांना समान संधी द्यावी व उप-आरोग्य पदाची व सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाची पदे भरण्यात यावी.

COMMENTS