PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे

PMC Health Department

HomeBreaking News

PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे

Ganesh Kumar Mule Aug 22, 2024 9:13 PM

Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार 
Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!
Otherwise construction will have to be stopped | PMC Commissioner Dr. Rajendra Bhosale

PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे

| कारभारात सुधारणा होण्याची महापालिका आयुक्त यांना अपेक्षा

 

 

PMC Assistant Health Officer- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग (Pune Municipal Corporation Health Department) गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत होता. विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत होते. त्यामुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल केले आहेत. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले ((Dr Rajendra Bhosale IAS) नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune PMC News)

दरम्यान आयुक्तांनी कामकाजात बदल केले असले तरी मात्र एका खासदाराच्या सांगण्यावरून आणि काही अधिकाऱ्याना हवा तो पदभार दिला जावा म्हणून या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे. नवीन आरोग्य प्रमुखांना खात्याची अजून काही माहिती नाही. तसेच खासदारांना देखील अर्धवट माहिती देऊन हवे ते पदभार घेतला असल्याची चर्चा विभागात सुरू आहे.

दरम्यान शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेविषयी बऱ्याच तक्रारी आल्यानंतर हे कामकाज सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे यांच्याकडे देण्यात आले आहे. हे कामकाज डॉ मनीषा नाईक पाहत होत्या. याशिवाय डॉ वावरे यांच्याकडे औषध भांडार, महापालिका रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकीकरण, आरोग्य प्रकल्प, परिमंडळ १ सनियंत्रण व पर्यवेक्षण अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उपआरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांना फक्त जन्म मृत्यू, विवाह नोंदणी आणि स्मशानभूमी, दफनभूमी अद्यावतीकरण ची जबाबदारी होती. ती कमी करत आता त्यांना PCPNDT, MTP act, मेडिकल कॉलेज व्यवस्थापन, मेडिकल यूनिट आणि आरोग्य विभागाकडील सामान्य प्रशासन ची जबाबदारी देण्यात आली आहे. PCPNDT आणि MTP ची जबाबदारी पूर्वी डॉ सूर्यकांत देवकर यांच्याकडे होती. तसेच १ ते ३ लाख पर्यंतची वैद्यकीय बिलांची देयके मान्य करण्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ वैशाली जाधव यांच्याकडील NUHM ची जबाबदारी डॉ मनीषा नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच जन्म मृत्यू, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, परिमंडळ २ सनियंत्रण ची जबाबदारी डॉ नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.

डॉ वैशाली जाधव यांच्याकडे साथरोग नियंत्रण कार्यक्रम, DPDC, महापौर निधी, एनसीडी, परिमंडळ ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांच्याकडील पहिल्या  सगळ्याच जबाबदाऱ्या कमी करत पूर्णपणे नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. डॉ देवकर यांच्याकडे आता जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट, नर्सिंग होम रजिस्ट्रेशन, विकेंद्रित परवाना विभाग, AIDS, परिमंडळ ३ च्या सनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ राजेश दिघे यांच्याकडील कामाचा आवाका वाढवण्यात आला आहे. डॉ दिघे यांच्याकडे फक्त राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम ची जबाबदारी होती. ती तशीच कायम ठेवत कीटक प्रतिबंधक विभाग, CSR, स्मशानभूमी, दफनभूमी संबंधित कामकाज, बोगस डॉक्टर शोध मोहीम, परिमंडळ ५ चे सनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0