PMC General Body Meeting | कालच्या मुख्य सभेत ९५ प्रस्ताव मंजूर!

Homeadministrative

PMC General Body Meeting | कालच्या मुख्य सभेत ९५ प्रस्ताव मंजूर!

Ganesh Kumar Mule Mar 24, 2026 8:08 AM

Ganesh Bidkar : Election : महाविकास आघाडीतील पक्ष विचाराने कधी एकत्र येऊ शकत नाहीत  : सभागृह नेते गणेश बिडकर
PMC BJP Leader Ganesh Bidkar | गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी | शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार – गणेश बिडकर
Ganesh Bidkar : Light House : गणेश बिडकर यांनी सुरु केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा : चंद्रकांत पाटील

PMC General Body Meeting | कालच्या मुख्य सभेत ९५ प्रस्ताव मंजूर!

मुख्य सभेत ‘झिरो पेंडन्सी’ साध्य | सभागृह नेते गणेश बिडकर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – काल पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत  जवळपास ९५ विषयांना मंजुरी देण्यात आली.  केवळ एका विषयावर मतदानाची गरज भासली, तर इतर सर्व विषय एकमताने मंजूर झाले.

सकाळी साडेअकरापासून ते संध्याकाळी आठपर्यंत अखंडपणे कामकाज सुरू ठेवत, सर्व प्रलंबित विषयांवर निर्णय घेण्यात आला. परिणामी, महापालिकेच्या कामकाजावर एकही विषय शिल्लक राहिला नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची ‘झिरो पेंडन्सी’ कदाचित पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. (House Leader Ganesh Bidkar)

यात विविध विषयांचा समावेश आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सेवा नियामवली  पासून ते विविध विकास कामांचा यात समावेश आहे.

——–

“पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत आज ‘झिरो पेंडन्सी’ साध्य होणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करत जवळपास ९५ विषय मंजूर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत एकही विषय प्रलंबित राहू दिला नाही. हा नागरिकांच्या विश्वासाला दिलेला ठोस प्रतिसाद आहे.”

| गणेश बिडकर, सभागृह नेते 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: