PMC Garden Department | पुणे महापालिकेचे 42 वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 10 आणि 11 फेब्रुवारीला!

HomeBreaking Newsपुणे

PMC Garden Department | पुणे महापालिकेचे 42 वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 10 आणि 11 फेब्रुवारीला!

गणेश मुळे Feb 08, 2024 6:19 AM

PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 
  Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!  |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation
  First Prize to Hindustan Petroleum Corporation Limited in Pune Municipal Corporation’s 42nd Fruits, Flowers and Vegetables Exhibition!

PMC Garden Department | पुणे महापालिकेचे 42 वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 10 आणि 11 फेब्रुवारीला!

| 10 फेब्रुवारीला महापालिका आयुक्तांच्या हस्ते होणार उदघाटन

PMC Garden Department | पुणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिना (Pune Municipal Corporation (PMC) Anniversary) निमित्ताने ४२ वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन, १० व ११ फेब्रुवारी २०२४ करिता छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, (PMC Chhatrapati Sambhaji Garden J M Road) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार  १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता  विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक, (Vikram Kumar IAS) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी दिली. (PMC Garden Department)

फुले, फळे, भाज्या, झाडे किंवा रोपे यांची प्रदर्शन आयोजित करणे, तसेच अशी प्रदर्शने आयोजित करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक संस्थांना सहाय्य करणे आणि झाडे व वनस्पती यांचे मानवी जीवनात जे महत्वाचे स्थान आहे.  त्याबद्दल लोकमत तयार करणे या उद्देशाने पुणे मनपाच्यावतीने दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. (Pune PMC News)
या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण १२ विभाग असून, २१६ उपविभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पाना फुलांच्या कुड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाब पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड सजावट बचत गटातील माहिलांसाठी, फळे, भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्प गुच्छ, शिंपले, वेण्या, गजरे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, अॅन्थूरीअम, जरबेरा गुलाब, कार्नेशन इ.प्रकराची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानाच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. सदरहू प्रदर्शन निमित्ताने घेणेत आलेल्या विविध स्पर्धा मध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ 11 फेब्रुवारी रोजी सांयकळी५.०० वाजता छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने, पुणे विद्यापीठ, मेट्रो, नदी सुधारणा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, एन.डी.ए., सी.एम.ई, वन विभाग, पुणे सर्प विज्ञान संस्था, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पर्यावरण केंद्र, पुष्करणी उत्तरा पर्यावरण केंद्र, लोणावळा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय फ्रेडंस ऑफ बोन्साय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इ. विभाग/ संस्था सहभागी होणार आहेत. या प्रदर्शना मध्ये बोन्साय, काष्ठ शिल्प, फिचर्स गार्डन, कागदी कलाकुसर, विविध प्रकारच्या पुष्परचना इ. नागरिकांना पहावयास मिळणार आहेत. तसेच माझी वसुंधरा वृक्ष लावा, वृक्ष जगवा, सायकलचा वापर जास्तीत जास्त करण्यात यावा, अशा प्रकारच्या संकल्पना साकारण्यात येणार आहेत. छायाचित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये फुले, फळे, वृक्षांची रोपे, बागकाम साहित्य, बी- बियाणे, खते यांचे विक्रीचे स्टॉल रहाणार असून नागरिकांनी  १० व ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.३० वा पर्यंत विविध बाग विषयक वस्तू / साहित्य खरेदी करता येईल. सदरचे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामुल्य खुले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.