PMC Garden Department | अवघ्या 5 रुपयात पुणे महापालिकेकडून घ्या स्थानिक जातीची रोपे

HomeपुणेBreaking News

PMC Garden Department | अवघ्या 5 रुपयात पुणे महापालिकेकडून घ्या स्थानिक जातीची रोपे

गणेश मुळे Jun 04, 2024 4:02 PM

Pune Municipal Corporation’s 42nd Fruits, Flowers and Vegetables Exhibition inaugurated by PMC Commissioner Vikram Kumar!
PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 
  Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!  |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation

PMC Garden Department | अवघ्या 5 रुपयात पुणे महापालिकेकडून घ्या स्थानिक जातीची रोपे

PMC Garden Department- (The Karbhari News Service) – मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका अल्प दरात नागरिकांना रोपे उपलब्ध करून देणार आहे. अवघ्या 5 रुपयात नागरिकांना रोपे घेता येणार आहेत. अशी माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिका मार्फत दरवर्षी “ ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या ” निमित्ताने वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागामार्फत वनमहोत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजीराजे उद्यान, शिवाजीनगर,
पुणे येथे करण्यात येते. यावर्षीही शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी यादृष्टीने व नागरिकांना वृक्ष लागवड करणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून अल्पदरात स्थानिक वृक्ष प्रजातीच्या रोपांची विक्री छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रोड येथे करण्यात येणार आहे.  5 जून ते 14 ऑगस्ट  पर्यंतच्या कालावाधीत वनमहोत्सवा अंतर्गत नागरिकांना स्थानिक जातीची एक ते दीड फुट उंचीची रोपे अल्पदरात (अवघ्या पाच रुपयात ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या वनमहोत्सवाचा शुभारंभ 5 जून रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक, पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी या वनमहोत्सवाचा लाभ घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून शहराच्या हरितच्छादन वाढविणेस हातभार लावावा. असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.
संपर्क :- श्री. रविंद्र कांबळे भ्रमणध्वनी क्रमांक ८३०८८४१५२५ व श्री. हरीश गोळे, यांचेशी संपर्क साधण्यात यावा.
• रोपे मिळण्याचे ठिकाण :- छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे
• रोपे मिळण्याचा कालावधी :- दिनांक ५ जून २०२४ ते दिनांक १४ ऑगस्ट २०२४
• वेळ :- सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यत (सुट्ट्या वगळून वृक्ष विक्री करण्यात येणार आहे)
ही मिळतील रोपे 
करंज
कांचन
चिंच
अर्जुन
जांभूळ
करमळ
मोहा
धावडा
ताम्हण
मुचकुंद
करवंद
बहावा
खाया
कैलासपती
अलमोरा
मेहंदी