PMC Ganesh Immersion | गणेशोत्सवात गेल्या ९ दिवसांत २ लाख ४ हजार ७४४ किलो जमा झाले निर्माल्य!   | ४७ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

Homeadministrative

PMC Ganesh Immersion | गणेशोत्सवात गेल्या ९ दिवसांत २ लाख ४ हजार ७४४ किलो जमा झाले निर्माल्य! | ४७ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

Ganesh Kumar Mule Sep 16, 2024 7:47 AM

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन
Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे 
Ganesh Idol PMC Pune | गणेशोत्सवात ५ लाख ५९ हजार ९५२ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ७ लाख ६ हजार ४७८ किलो जमा झाले निर्माल्य!

PMC Ganesh Immersion | गणेशोत्सवात गेल्या ९ दिवसांत २ लाख ४ हजार ७४४ किलो जमा झाले निर्माल्य!

| ४७ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – यंदाच्या गणेश उत्सवात (Pune Ganeshotsav) पुणेकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत देखील आहेत. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात गेल्या ९ दिवसांत २ लाख ४ हजार ७४४ किलो निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात ४७ हजाराहून अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत. तर आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार ७०८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation-PMC)

| फिरते हौद नसल्याने तक्रारी कमी झाल्या

गणेशाला निरोप देताना नदीपात्रातील विसर्जन घाटावर आणि कृत्रिम हौदात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मागील काही वर्षी घरच्या घरी विसर्जन, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरते हौद असे तीन पर्याय पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र फिरत्या हौदामुळे तक्रारी वाढल्या होत्या. हे लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने फिरते हौद बंद करुन टाकले होते. त्यामुळे तक्रारी कमी आल्या. दरम्यान यंदा मूर्ती संकलन केंद्र, लोखंडी टाक्या आणि बांधलेले हौद असे पर्याय गणेश विसर्जन साठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

——

 

| संकलित मूर्तींची संख्या : ४७ हजार २१४

| बांधलेल्या हौदातील मूर्तींची संख्या : २४ हजार ४८१

| लोखंडी टाक्यातील मूर्तींची संख्या : १ लाख ३ हजार ६३३

| एकूण मूर्ती विसर्जन : १ लाख ७५ हजार ७०८

| जमा झालेले निर्माल्य : २ लाख ४ हजार ७४४ किलो