PMC Fireman Bharti  | फायरमन पदाच्या लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका व विवरणी मनपा वेबसाईट वर  प्रसिद्ध

HomeBreaking Newsपुणे

PMC Fireman Bharti | फायरमन पदाच्या लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका व विवरणी मनपा वेबसाईट वर प्रसिद्ध

कारभारी वृत्तसेवा Dec 23, 2023 6:21 AM

Narayan Hut Shikshan Sanstha’s School | नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!
Pune PMC Charging Station Rates| चार्जिंग स्टेशन मधील चार्जिंग चे दर १३.२५ रु प्रति युनिट ठेवावेत | सजग नागरिक मंचाची मागणी 
Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 

PMC Fireman Bharti  | फायरमन पदाच्या लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका व विवरणी मनपा वेबसाईट वर  प्रसिद्ध

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. दरम्यान अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आता अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.